JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / RCB च्या लोगोवरून विराट आधी भडकला आता म्हणतो, 'लोगो' का काम होता है कहना

RCB च्या लोगोवरून विराट आधी भडकला आता म्हणतो, 'लोगो' का काम होता है कहना

आरसीबीने त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरून लोगो काढून टाकल्यानंतर कर्णधाराला न सांगताच हे केलंत असं विराट म्हणाला होता. आता नव्या लोगोचे अनावरण केल्यानंतर विराटने पुन्हा ट्विट केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 फेब्रुवारी : आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सर्व सोशल मीडियावरून फोटो काढून टाकण्यात आले होते. यानंतर विराट कोहलीने याबाबत ट्विट करून आश्चर्य व्यक्त केलं होतं. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले, लेग स्पिनर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळणाऱ्या युजवेंद्र चहल यांनीही ट्वीट करून यामागचे कारण विचारले. इतकंच काय तर आरसीबीचे ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडल ब्लॉक झाले आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे. नवीन दशक, नवीन आरसीबी आणि नवीन लोगो यासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने नव्या लोगोचे अनावरण केलं आहे. सर्व सोशल मीडिया अकाउंटवरून आरसीबीने लोगोचे फोटो डिलीट केल्यानंतर विराटने आश्चर्य व्यक्त केलं होतं. कर्णधार असूनही मला काहीच माहिती नाही. तुम्हाला माझ्या मदतीची गरज असेल तर सांगा असंही विराट म्हणाला होता. आरसीबीने नवा लोगो लाँच केल्यानंतर विराटने ट्विट करत म्हटलं की, लोगो का काम है कहना. तसंच नव्या लोगोसह खेळण्यासाठी उत्सुक असल्याचंही विराट म्हणाला.

विराट आणि चहल यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर अनेकांनी वेगवेगळ्या शंका व्यक्त केल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने हा रणनितीचा एक भाग असू शकतो असं म्हटलं होतं.

आरसीबीने आतापर्यंत 12 हंगामात एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. 2009 आणि 2011 या दोन हंगामात आरसीबीचा संघ उपविजेतेपदावर राहिला. अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता. तर, 2020साठी बंगळुरूने काही महत्त्वाच्या खेळाडूंना त्याच्या संघाचा भाग बनवले आहे. ज्यात अ‍ॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस, वरुण चक्रवर्ती, केन रिचर्डसन, जोश फिलिप यांचा समावेश आहे. VIDEO : बोल्टपेक्षा वेगाने धावला भारतीय तरुण? 100 मीटर अंतर कापलं 9.55 सेकंदात RCBचा संघ- विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत पड्डीकल, पार्थिव पटेल, अरॉन फिंच, जोशुआ फिलिपी, शाहबाद अहमद, गुरकीरत मान, पवन देशपांडे, मोइन अली, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, इसरु उडाना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन आणि डेल स्टेन. युवराजनंतर आणखी एका क्रिकेटपटूला कॅन्सर, धैर्याने मात करत झळकावलं शतक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या