आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोठा मासा गळाला लावत, बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीला केवळ सहा धावातच बाद केले. मोठा फटका मारण्याच्या नादात कोहलीने जडेजाच्या हातात अगदी सोपा झेल देत बाद झाला.
बंगळुरु, 14 एप्रिल : सलग सहा सामन्यात पराभव मिळाल्यानंतर अखेर दणक्यात विराटच्या सेनेनं आपला पहिला विजय नोंदवला. या विजयासाठी विराटला चक्क सात सामन्यांची वाट पाहावी लागली.
या विजयाच्या मागे एबी डिव्हिलियर्सच्या अर्धशतकी खेळाचा मोठा हा होता. तर, विराटनं 53 चेंडूत 67 धावा करत आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेले. तर एबीनं 59 धावा केल्या. या धावांच्या जोरावर बंगळुरूनं पंजाबच्य संघावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर कोहली आणि त्यांचे चाहते सुखावले असला तरी सोशल मीडियावर त्याची चांगलीच थट्टा उडवली जात आहे. RCBच्या चाहत्यांनी आता सेलिब्रेशन टाईम आहे, असं म्हणत मीम तयार केलं.
तर, दुसरीकडं सलग सहा जिंकल्यानंतर आता एक सामना जिंकून RCB प्ले ऑफमध्ये जाणार आहे का?, असा सवाल चाहते विराटला विचारत आहेत.
काही चाहत्यांनी तर, आम्हाला विश्वास बसत नाही की बंगळुरू सामना जिंकला असं म्हणत ट्रोल केलं आहे.
ऐसा पहिली बार हुआ है, सतरा अठरा सालो में…असा खोटक मेम काही चाहत्यांनी केलं आहे.
दरम्यान कोहलीला प्ले ऑफमध्ये आपल्या संघाची जागा करायची असल्यास आता सर्व सामने जिंकणे बंधनकारक आहे. धक्कादायक! टोल नाक्यावर गाडी अडवल्यानं कर्मचाऱ्याला 8 किमी फरफटत नेलं