भर मैदानात विराट अंपायरवर भडकला, म्हणाला 'मी असतो तर....'
मुंबई, 13 मार्च : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने काल अहमदाबाद येथील स्टेडियमवर कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे 75 वे शतक ठोकले. विराटाचे कसोटी क्रिकेटमधील हे 28 वे शतक होते. मात्र आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटच्या दिवशी सुरु असलेल्या सामन्यात विराट कोहली अंपायरवर भडकला. त्याने लाईव्ह मॅचदरम्यान अंपायरला खोचक टोमणा मारला. सध्या विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यातील शेवटच्या दिवशी विराट कोहलीने मैदानात फिल्डिंग करताना अंपायर नितीन मेनन यांना टोमणा मारला. झालं असं की, ऑस्ट्रेलिया इनिंगमध्ये 35 व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेड विरोधात भारतीय संघाने एलबीडब्ल्यूच अपील केलं. त्यावर अंपायर नितीन मेनन यांनी नॉटआऊट दिलं. टीम इंडियाने यावर रिव्यू घेतला. थर्ड अंपायरने मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर विराट कोहलीने नितीन मेनन यांना टोमणा मारला आणि विराटची ही प्रतिक्रिया स्टॅम्प माइकमध्ये रेकॉर्ड झाली. WTC Final : रोहितच्या मदतीला धावून आला विल्यमसन, पाहा अहमदाबाद कसोटी सुरु असतानाच कसं मिळालं भारताला WTC च्या फायनलचं तिकीट?
अंपायर नितीन मेनन यांनी अनेकदा विराट कोहलीला बाद केलं आहे. दिल्ली येथील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला वादग्रस्त पद्धतीने आऊट देण्यात आले होते. कुहनेमनच्या बॉलिंगवर विराट कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आलं होतं. त्यावेळी नितीन मेनन यांनीच विराट बाद झाल्याचा निर्णय दिला होता. यावेळी विराट कोहलीने अंपायरच्या निर्णयाविरोधात डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये थर्ड अंपायर चेंडू पहिला बॅटवर लागला की, पॅडवर हे ठरवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी मैदानावरील अंपायर नितीन यांचा निर्णय अंतिम ठेऊन विराटला बाद केले. त्यावेळी विराट फार रागावला होता.
अहमदाबाद येथील सामन्यताही ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या बाबतीत असाच प्रकार घडला परंतु यावेळी नितीन यांनी त्याला नॉट आउट दिले. यावर विराट अंपायरच्या जवळ गेला आणि म्हणाला, ‘मी असतो, तर आऊट दिलं असतं’. त्याच्या या कमेंट वर मेनन यांनी विराटला थम दाखवला.