JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'या' स्टार खेळाडूला विद्या बालनसोबत करायची आहे डिनर डेट

'या' स्टार खेळाडूला विद्या बालनसोबत करायची आहे डिनर डेट

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) संघाने प्रथमच विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. या विजयाचा खरा हिरा ठरला तो म्हणजे, प्रशांत चोप्रा((Prashant Chopr a). सध्या तो त्याच्या एका खासगी गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

जाहिरात

Prashant Chopra

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 जानेवारी: नुकतींच मागील महिन्यात भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021) पार पडली. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) संघाने प्रथमच या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. या विजयाचा खरा हिरा ठरला तो म्हणजे, प्रशांत चोप्रा(Prashant Chopra). सध्या तो त्याच्या एका खासगी गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. प्रशांतने उपांत्य फेरीत 78 धावांची खेळी खेळली. त्याचे या स्पर्धेतील 7 सामन्यातील हे 5 वे अर्धशतक ठरले. विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात या सलामीवीराने 8 सामन्यात 57 च्या सरासरीने 456 धावा केल्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने 5 सामन्यात 148 धावा केल्या. या फार्मात असलेल्या क्रिकेटरने एका मुलाखतीमध्ये इच्छा व्यक्त केली आहे. त्याला या मुलाखतीमध्ये अनेक सवाल उपस्थित केली आहेत. त्यावर तो बिनधास्त बोलला आहे. जेव्हा प्रशांतला विचारण्यात आले की त्याला कोणत्या सेलिब्रिटीसोबत डिनर डेटवर जायला आवडेल? तर त्याने विद्या बालनचे (Vidya Balan)नाव घेतले. मला विद्या बालनसोबत डिनर डेटवर जायला आवडेल. अशी इच्छा त्याने यावेळी व्यक्त केली. तसेच त्याला महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni)क्रिकेट नसते तर, अस सवाल केला असता. तो म्हणाला, बॅट हातात नसती तर तो इंजिनियर किंवा गायक झाला असता. यासोबतच, त्याला कसोटी क्रिकेट आवडते आणि त्याचा आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे आणि मास्टर ब्लास्टरमुळे त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळायला आवडेल. अशी इच्छादेखील त्याने यावेळी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या