JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : टीम इंडियाने सुरू केली Isolation Cricket League, असा सामना तुम्ही कधीच पाहिला नसेल

VIDEO : टीम इंडियाने सुरू केली Isolation Cricket League, असा सामना तुम्ही कधीच पाहिला नसेल

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे क्रिकेट स्पर्धा ही रद्द झाल्यानं खेळाडूंनाही घरात कैद व्हावे लागले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 एप्रिल : वेगाने पसरत असलेल्या कोरोनाव्हायरसमुळे  जणू संपूर्ण जगाला फुलस्टॉप लागला आहे. सर्वच देशांनी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्व रस्ते, गल्ल्या आणि परिसर शांत झाले आहेत. अशातच क्रिकेट स्पर्धा ही रद्द झाल्यामुळे खेळाडूंनाही घरात कैद व्हावे लागले आहे. मात्र भारताच्या महिला क्रिकेट संघाने यावर एक उपाय काढला आहे. हा उपाय म्हणजे Isolation Cricket League. भारतीय महिला संघातील काही खेळाडूंनी या काळात खेळाशी जोडलेला राहण्यासाठी एक अजब मार्ग निवडला आहे. त्यांनी सुरू केलेल्या स्पर्धेत सामाजिक अंतर आणि लॉकडाऊन यांचेही पालन केले आहे.  त्यामुळे हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कल्पना येईल की आजच्या युगात काहीही घडू शकते. भारतीय संघातील फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने एक व्हिडीओ ट्विट केलं आहे. यामध्ये ती इतर काही खेळाडूंसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये वेदा ने लिहिले आहे की, ‘आम्ही क्रिकेटला खूप मिस करत आहोत म्हणून आम्ही घरच्या घरी एका क्रिकेट लीगची स्थापना केली. सादर करतो ‘Isolation Cricket League’. या व्हिडीओमध्ये वेदा तिच्या घरातील बाल्कनीत फलंदाजी करताना दिसत आहे. तर, आकांक्षा कोहली यष्टिरक्षण करत आहे. एवढेच नाही तर लिसा स्थळेकर समालोचन करताना दिसत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू रीमा मल्होत्रा ​​तिच्या घरातून गोलंदाजी करताना दिसत आहे.

तिसर्‍या सीनमध्ये भारतीय खेळाडू मोना मेश्राम मैदानात उतरताना दिसत आहे. हा व्हिडीओ अशा प्रकारे एडिट केला गेला आहे की आपल्याला या एकत्र खेळत आहे असा भास होईल. या व्हिडीओच्या शेवटी, दोन मुली प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.या व्हिडीओ बरोबरच क्रिकेटपटूंनी, लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. हे वाचा : …तर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात 4 कोटी 20 लाख डॉलरच्या हॉटेलमध्ये होणार क्वारंटाइन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या