एका चेंडुवर दोन डीआरएस
चेन्नई, 15 जून : तामिळनाडुत सुरू असलेल्या टीएनपूएलमध्ये एकाच चेंडूवर दोन वेळा डीआरएस घेतल्याचा प्रकार घडला. मैदानावरील पंचांच्या नव्हे तर थर्ड अंपायरच्या निर्णयावरही डीआरएस घेतला गेला. भारताचा फिरकीपट्टू अश्विनने थर्ड अंपायरच्या निर्णयावरच डीआरएस घेत आव्हान दिलं. एकाच चेंडुवर दोनवेळा डीआरएस घेण्याची ही दुर्मिळ घटना आहे. टीएनपीएलमधला चौथा सामना अश्विनच्या नेतृत्वाखालील डिंडीगुल ड्रॅगन्स आणि Ba11sy ट्रीची यांच्यात खेळला गेला. या सामन्यात फलंदाजाने पंचांच्या निर्णयावर डीआरएस घेतला. तो फलंदाजाच्या बाजूने निकाल लागला. त्यावर गोलंदाजाने रिव्ह्यू घेतला. शेवटी कॅचसाठी थर्ड अंपायरनी पुन्हा रिव्ह्यू घेतला आणि त्यांना मैदानी पंचांनी दिलेला निर्णय बदलावा लागला. सारा तेंडुलकरनं नवीन फोटो टाकला आणि गिलच्या नावाची रंगली चर्चा, कमेंटमध्ये नुसत्या अफेअर्सच्या चर्चा सामन्याच्या १३ व्या षटकात अखेरच्या चेंडूवर अश्विनने ट्रिचीचा फलंदाज आर राजकुमारची विकेट घेतली. राजकुमार यष्टीमागे झेलबाद झाला. मैदानी पंचांनी त्याला बाद दिलं. पण फलंदाजाने डीआरएस घेतला. तेव्हा थर्ड अंपायरना वाटलं की, जो आवाज आला तो बॅट जमिनीवर लागल्याने आला म्हणून पंचांनी त्याला नॉट आऊट दिलं.
थर्ड अंपायरच्या या निर्णयामुळे डिंडीगुलचा कर्णधार आणि गोलंदाज आर अश्विन नाराज होता. त्याने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. थर्ड अंपायरने पुन्हा तेच अँगल चेक केले. आऊट दिलेला निर्णय रद्द करत फलंदाजाला नाबाद ठरवण्यात आले. अश्विन पंचांच्या या निर्णयावरही नाराज दिसला.