टोकयो, 30 ऑगस्ट: टोकयो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरत आहे. अवनी लखेरानं शूटिंगमध्ये ऐतिहासिक गोल्ड मेडलची कमाई केली. त्यापाठोपाठ योगेश कथूनियानं (India’s Yogesh Kathuniya wins silver medal in discus throw) थाळी फेक स्पर्धेत सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. भारताला या स्पर्धेत मिळालेलं हे पाचवं मेडल आहे.
योगेशला आठव्या वर्षी लकवा झाला होता. त्यानं या व्याथीवर मात करत ही कमाई केली. थाळीफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्यानं सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत सिल्व्हर मेडल पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या यशाबद्दल योगेशचं अभिनंदन केलं आहे.
यापूर्वी भारताच्या अवनी लखेरानं 10 मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल पटकावलं आहे. 19 वर्षांच्या या महिला शूटरनं 294.6 पॉईंट्सची कमाई करत गोल्ड मेडल पटकावले. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिलेनं पटाकवलेलं हे पहिलं गोल्ड मेडल आहे.