JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Olympic मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्राबाबत मोठी बातमी, दोन दिवसांपासून 103 डिग्री ताप

Tokyo Olympic मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्राबाबत मोठी बातमी, दोन दिवसांपासून 103 डिग्री ताप

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला एकमेव गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकवून देणाऱ्या नीरज चोप्राला (Neeraj Chopra Fever) दोन दिवसांपासून ताप येत आहे.

जाहिरात

नीरज चोप्राला दोन दिवसांपासून ताप

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला एकमेव गोल्ड मेडल (Gold Medal) जिंकवून देणाऱ्या नीरज चोप्राला (Neeraj Chopra Fever) दोन दिवसांपासून ताप येत आहे. नीरज चोप्रा याला मागच्या दोन दिवसांपासून 103 डिग्री ताप आहे. ताप आल्यानंतर नीरज चोप्राची कोरोना टेस्ट (Corona Test) करण्यात आली, या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. डॉक्टरांनी नीरजला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. टोकयोमधून परतल्यानंतर तो वारंवार सत्कार समारंभाला उपस्थित राहत आहे. या थकव्यामुळे त्याला ताप आल्याची शक्यता आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये नीरजने भालाफेक स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी टोकयो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या खेळाडूंना 14 ऑगस्टला संध्याकाळी राष्ट्रपती भवनात आमंत्रित केलं आहे. नीरजचा ताप उतरला, तर तो या कार्यक्रमात सहभागी होईल. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय खेळाडूंना लाल किल्ला आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानीही जायचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या