टोकयो, 2 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) घोडेस्वारीच्या जम्पिंग इव्हेंटमध्ये उतरलेला भारतीय घोडेस्वार फवाद मिर्झा (Fouaad Mirza) याने धमाकेदार कामगिरी केली आहे. मिर्झाने 47.20 च्या मजबूत स्कोअरसह वैयक्तिक इव्हेंटच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे, पण फवादला मेडल मिळण्याची शक्यता कमी आहे. ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवून त्याने खास कामगिरी केली आहे. फवाद मिर्झा 20 वर्षांमधला पहिला घोडेस्वार आहे, ज्याने भारताचं ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन दशकांपेक्षा जास्त काळ घोडेस्वारीमध्ये उतरेला फवाद मिर्झा क्रॉस कंन्ट्री स्पर्धेनंतर 11.20 पेनल्टी अंकासह 22 व्या क्रमांकावर राहिला होता.
फवाद ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झालेला तिसरा भारतीय घोडेस्वार आहे. याआधी इंद्रजीत लांबा 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये आणि इम्तियाज अनीस 2000 सालच्या सिडनी ऑलिम्पिक इव्हेंटिगमध्ये क्वालिफाय झाले होते. इंद्रजीत लांबा ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधीत्व करणारे पहिले वैयक्तिक भारतीय घोडेस्वार होते.