आज भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपटही या गोष्टीवरच आधारित आहे. यात रणबीर सिंगने कपिल देव यांची, चिराग पाटील याने आपल्या वडिलांची म्हणजेच संदीप पाटील यांची तर आदिनाथ कोठारेने दिलीप वेंगसरकर रुपेरी पडद्यावर साकारले होते.
कबीर खान दिग्दर्शित 83 या चित्रपटात भारताने जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकाची कथा मांडण्यात आली आहे. यात कपिल देव यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंग यांने साकारली होती.
ज्येष्ठ क्रिकेटपटू संदीप पाटील यांच भूमिका त्यांच्याच मुलाने म्हणजे चिराग पाटीलने केली आहे. चिरागने याआधी वजनदार, येक नंबर आणि वेक अप इंडिया या चित्रपटात काम केले आहेत.
मुझसे फ्रेंडशिप करोगे तसेच रात अकेली है या वेब सिरीजमध्ये दिसलेल्या निशांत दाहियाने ऑल राऊंडर रॉजर बिन्नीची भूमिका केली होती.
मिडीयम पेसर असलेल्या बलंविदर सिंह संधूची भूमिका पंजाबी गायक आणि अभिनेता अॅमी विर्क याने केली होती.
टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांची भूमिका धैर्य कारवा याने केली होती. या भूमिकेबद्दल धैर्यचे खूप कौतुक झाले होते.