JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / AUS vs ENG: रहाणेनंतर बोलैंडला मिळालं 'Mullagh Medal', 153 वर्ष जुना इतिहास

AUS vs ENG: रहाणेनंतर बोलैंडला मिळालं 'Mullagh Medal', 153 वर्ष जुना इतिहास

आपल्या पहिल्या वहिल्या टेस्ट मॅचमध्ये भेदक गोलंदाजी करत स्कॉट बोलैंड (Scott Boland) ने मेलबर्नच्या मैदानात इतिहास रचला.

जाहिरात

Mullagh Medal

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 28 डिसेंबर: आपल्या पहिल्या वहिल्या टेस्ट मॅचमध्ये भेदक गोलंदाजी करत स्कॉट बोलैंड (Scott Boland) ने मेलबर्नच्या मैदानात इतिहास रचला. कंगारुंच्या संघाने इंग्लंडला एक(Australia vs England) डाव आणि 14 धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या या विजायात स्कॉट बोलैंडचा सिंहाचा वाटा आहे. बोलैंडने दुसऱ्या डावात केवळ 7 रन देत 6 विकेट घेतल्या. पदार्पणातच मॅन ऑफ द मॅचसब स्कॉट बोलैंडला मुलाघ मेडल (Mullagh Medal) देऊन सन्मानीत करण्यात आले. इंग्लंडने पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या 185 धावांना प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 267 धावा केल्या आणि 82 धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्सला पाचव्या षटकात मिचेल स्टार्कने त्रिफळाचीत केले. 32 वर्षीय बोलैंडने पहिल्याच षटकात जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर जगातील नंबर दोनचा कसोटी फलंदाज जो रूट (28) दुसऱ्याच षटकात त्याचा बळी ठरला. मार्क वुड आणि ऑली रॉबिन्सन तिसर्‍याच षटकात बाद झाले आणि दोघांना खातेही उघडता आले नाही. कॅमेरून ग्रीनने जेम्स अँडरसनला बोल्ड करून इंग्लंडचा दुसरा डाव 27.4 षटकांत संपुष्टात आणला. सामन्यात 55 धावांत सात विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियन पुरुष संघाकडून कसोटी खेळणारा तो दुसरा मूळ क्रिकेटपटू आहे. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचे जॉनी मुलाघ पदकाने गौरवण्यात आले.

153 वर्ष जुना इतिहास

जॉनी मुलाघ हे परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टीमचे पहिले कर्णधार होते. मुलाग यांच्या नेतृत्वात 1868 साली ऑस्ट्रेलियाच्या टीमने इंग्लंडचा दौरा केला होता. मुलाघ ऑलराऊंडर होते. मुलाघ यांचं खरं नाव उनारिमिन होतं, त्यांनी 45 टेस्टमध्ये 23 च्या सरासरीने 71 इनिंगमध्ये 1,698 रन केले होते. तसंच त्यांनी 1,877 ओव्हरही टाकल्या होत्या, यातल्या 831 ओव्हर मेडन होत्या. मुलाघ यांनी 10 च्या सरासरीने 257 विकेटही घेतल्या होत्या. मुलाघ यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कामचलाऊ विकेट कीपरची भूमिकाही निभावली आणि चार स्टम्पिंग केले. 2020 मध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला (मॅन ऑफ द मॅच) मुलाघ मेडल देऊन गौरवण्याची सुरुवात झाली. त्यावेळी, अजिंक्य रहाणेला पहिल्यांदाच मेलबर्नमध्ये हे पदक देऊन गौरवण्यात आले होते. कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 223 चेंडूत 112 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 12 चौकार मारले. यानंतर दुसऱ्या डावात रहाणेने 40 चेंडूत नाबाद 27 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 70 धावांचे लक्ष्य दिले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या