15 जुलै : स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाने अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सला पराभूत करत विम्बल्डन महिला एकेरीचं जेतेपद पटकावलंय. मुगुरूझा सातवेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या व्हिनसचा 7-5,6-0 ने पराभव केला. मुगुरूझाने पहिल्यांदाच विम्बल्डनवर आपले नाव कोरले आहे. गार्बिन मुगुरूझाचं हे दुसरं ग्रँड स्लॅम होतं. तिने 2016मध्ये फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावलं होतं. गंमतीची गोष्ट म्हणजे मागील वर्षीच तिने सेरेना विल्यम्सला पराभूत करून फ्रेंच ओपनचं जेतेपद जिंकलं होतं. मुगुरूझा ला व्हेनेझुएलामध्ये जन्म झाला. ती स्विझरलँडमध्ये राहते आणि स्पेनसाठी टेनिस खेळते. दुसरीकडे, 37 वर्षीय व्हिनस सहाव्यांदा विम्बल्डनचं जेतेपदाने हुलकावणी दिलीये. व्हिनसने दोनवेळा अमेरिकी ओपनचा किताब जिंकलाय. व्हिनसची छोटी बहिणी सेरेनाने आॅस्ट्रेलियन किताब जिंकला होता. व्हिनसकडे आपल्या लहान बहिणीला मागे टाकण्याची आज संधी होती मात्र मुगुरूझाने ती हिसकावून घेतली. पहिल्या सेटमध्ये दोघांमध्ये कडवी झुंज झाली. व्हिनसही मागे हटण्यास तयार नव्हती तर मुगुरूझाने थेट प्रहार करत आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मुगुरूझाने शानदार खेळी करत विनसला मागे सारलं आणि 6-0 ने जेतेपदावर नावं कोरलं.