JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मोठी बातमी! टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव; एकाला प्लेअरचा Covid 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह

मोठी बातमी! टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव; एकाला प्लेअरचा Covid 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह

Covid case in Team India: इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै : टीम इंडिया (Team India) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर (England Tour) आहे. मात्र, या दौऱ्या दरम्यान भारतीय टीममध्ये कोरोनाचा संसर्ग (Corona in Team India) झाला आहे. टीम इंडियातील दोन प्लेअर्सला कोरोनाचा ससंर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या टीम इंडियातील प्लेअर्सचे नाव कळू शकलेले नाहीये. या दोघांपैकी एका प्लेअरची पुन्हा कोविड टेस्ट करण्यात आली आणि ती आता निगेटिव्ह आली आहे तर दुसऱ्या प्लेअरला क्वारंटाईन करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू करण्यात आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियातील या प्लेअरची कोविड टेस्ट नुकतीच पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे या प्लेअरला टीमपासून वेगळं ठेवण्यात आले असून तो आता टीमसोबत डरहम येथे जाणार नाहीये. तर इतर संपूर्ण टीम डरहमसाठी रवाना होणार आहेत जेथे टेस्ट सीरिजची प्रॅक्टिस मॅच होईल. मुझफ्फरपूरमध्ये होणार या क्रिकेटपटूचं मंदिर, सुधीर कुमारने सुरू केली तयारी इंग्लंडमध्ये कोरोनाचा उद्रेक गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पहायला मिळत आहे. इंग्लंड क्रिकेट टीममधील प्लेअरला सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता. इंग्लंडच्या 3 प्लेअर्ससोबत सात जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेस च्या वृत्तानुसार, या प्लेअरने काही दिवसांपूर्वी घशात खवखव असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तपासणी केली असता त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या हा प्लेअर आयसोलेशनमध्ये आहे. यासोबतच त्याच्या संपर्कात आलेल्या इतर काही प्लेअर्स आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही तीन दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या हा कोविड बाधित प्लेअर क्वारंटाईन असून तो डरहम कॅम्पचा हिस्सा बनणार नाहीये. कोरोनामुक्त झाल्यावर हा प्लेअर डरहमसाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या