JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup च्या वेळापत्रकात बदल, टीम इंडिया आधी या दोन टीमविरुद्ध खेळणार!

T20 World Cup च्या वेळापत्रकात बदल, टीम इंडिया आधी या दोन टीमविरुद्ध खेळणार!

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 17 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपच्या क्वालिफायर राऊंडला सुरुवात होणार आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई, 12 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 17 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपच्या क्वालिफायर राऊंडला सुरुवात होणार आहे. क्वालिफायर राऊंडमधल्या टॉप 4 टीम वर्ल्ड कपच्या सुपर-12 मध्ये सहभागी होतील. 23 ऑक्टोबरपासून सुपर-12 ला सुरुवात होणार आहे, पण आयसीसीने त्याआधी होणाऱ्या सराव सामन्यांमध्ये बदल केले आहेत. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार टीम इंडिया (Team India Practice Match) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळणार होती, पण आता भारताचे सराव सामने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 18 आणि 20 तारखेला या दोन मॅच होतील. या सराव सामन्यांच्या ठिकाणांमध्येही बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाचे दोन्ही सराव सामने दुबईमधल्या आयसीसी अॅकेडमी ग्राऊंडवर होणार आहेत. भारतीय वेळेनुसार हे सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. इंग्लंडचे सराव सामने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध त्याच दिवशी खेळवले जातील. तर ऑस्ट्रेलिया भारताशिवाय अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. तर पाकिस्तानची टीम इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरेल. सुपर-12 मध्ये खेळणाऱ्या प्रत्येक टीमला 2 सराव सामने देण्यात आले आहेत. सगळे सराव सामने अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियम, दुबईच्या आयसीसी अॅकेडमी ग्राऊंड आणि दुबईच्याच टोलेरन्स ओव्हलमध्ये होणार आहेत. 15 ऑक्टोबरला आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियाचे उरलेले खेळाडू वर्ल्ड कपच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. मुंबई इंडियन्समध्ये खेळणारे टीम इंडियाचे 6 खेळाडू आजच या बायो-बबलमध्ये येणार आहेत. भारताचे सराव सामने 18 ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 20 ऑक्टोबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टीम इंडियाचे वर्ल्ड कप सामने 24 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान 31 ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड 3 नोव्हेंबर : भारत विरुद्ध अफगानिस्तान 5 नोव्हेंबर : भारत विरुद्ध बी1 8 नोव्हेंबर : भारत विरुद्ध ए2

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या