JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / BCCIचा प्रश्न; पृथ्वी शॉच्या बॅटवर कोणाची स्वाक्षरी?

BCCIचा प्रश्न; पृथ्वी शॉच्या बॅटवर कोणाची स्वाक्षरी?

BCCI ने पृथ्वीच्या बॅटचा एक क्लोजअप फोटो ट्वीट केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: डोपिंग प्रकरणी आठ महिन्याच्या बंदीनंतर पृथ्वी शॉ(Prithvi Shaw)ने क्रिकेटमध्ये शानदार कमबॅक केले. प्रथम श्रेणी सामन्यात पृथ्वीने सातत्याने धावा करत आहे. पृथ्वीने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 (Syed Mushtaq Ali Trophy)क्रिकेट स्पर्धेत बुधवारी मुंबईकडून खेळताना पंजाबविरुद्ध (Mumbai vs Punjab)27 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या सामन्यात भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (BCCI)ने सामन्या दरम्यान पृथ्वीच्या बॅटचा एक क्लोजअप फोटो ट्वीट केला आहे. या फोटो पृथ्वीच्या बॅटच्या मागील बाजूस लिहलेला एक खास संदेश दिसत आहे. हा फोटो शेअर करताना बीसीसीआयने विचारले आहे की ही स्वाक्षरी कोणाची आहे? आता बीसीसीआयच्या या प्रश्नावर नेटीझन्स उत्तर देत आहेत. बीसीसीआयने पृथ्वी शॉच्या बॅटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर एक संदेश लिहला आहे. प्रिय पृथ्वी, खेळाचा आनंद घे, गुड लक. या संदेशानंतर त्याखाली ऑटोग्राफ देखील आहे. आता बीसीसीआयने हा फोटो शेअर करताना असा प्रश्न विचारला आहे की, ही स्वाक्षरी आहे कोणाची? पृथ्वीच्या बॅटवर कोणाची स्वाक्षरी आहे यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काहींच्या मते हा संदेश आणि स्वाक्षरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची आहे. तर काहींनी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli)याची असल्याचे म्हटले आहे. एका युझरने किंग कोहली असे तर दुसऱ्याने कोहली नेहमीच युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देतो.

बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोवर प्रत्येक जण स्वत:ची मते मांडत आहेत. पृथ्वीच्या या खेळीमुळे सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेतील पंजाबविरुद्धचा सामना मुंबईने जिंकला खरा. पण त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. या सामन्यात मुंबईने 243 धावा केल्या. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पंजाबला 150 धावसंख्येच्या आधी रोखणे गरजेचे होते. पंजाबाने 20 षटकात 221 धावा केल्या. मुंबईने 22 धावांनी हा सामना जिंकला पण त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करता आला नाही.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या