JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : कोरोनामुळे मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूची लागली वाट, करावं लागतंय घरकाम

VIDEO : कोरोनामुळे मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूची लागली वाट, करावं लागतंय घरकाम

कोरोनामुळे सर्व क्रिकेट सामना रद्द करण्यात आले. त्यामुळे सर्व क्रिकेटपटू सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे सध्या देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकजण सध्या घरी कैद झाला आहे. या विषाणूमुळे घरगुती कामे करणारे लोकही रजेवर आहेत. अशीच काहीशी परिस्थिती क्रिकेटपटूंचीही आहे. कोरोनामुळे सर्व क्रिकेट सामना रद्द करण्यात आले. त्यामुळे सर्व क्रिकेटपटू सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. यातच मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवची हालत मात्र खराब झाली आहे. याचा एका व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला. सूर्यकुमार यादव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो घरची कामे करताना दिसत आहे. यावेळी, त्याच्या शेजारी त्याचा कुत्राही बसलेला दिसत आहे. हा व्हिडीओ अपलोड करताना सूर्य कुमारने, ‘माझ्यावर अशी परिस्थिती आली आहे की पाब्लोही माझ्याकडे बघत नाही आहे’, असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओत सूर्य कुमार काम करताना मागे ‘मेरे हालात ऐसे हैं कि मैं कुछ कर नहीं सकता’ हे गाणे वाजताना दिसत आहे. सूर्य कुमार यादव सोशल मीडियावर खासकरुन टिकटॉकवर खूप अ‍ॅक्टिव असतो. तो पत्नी देवीशाबरोबर त्याने अनेक व्हिडीओ शेअर करत असतो.

रनमशीन झालाय सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा स्टार सूर्यकुमार यादव गेल्या काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये होता. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे आयपीएलमध्येही त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा आहे. मात्र सध्या कोरोना विषाणूमुळे आयपीएल ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. Coronavirus : दान केलेल्या रकमेवरून धोनी ट्रोल! साक्षी म्हणाली,‘लाज वाटते’ वर्षाला 800 कोटी कमवणाऱ्या धोनीने कोरोनाग्रस्तांना दिले फक्त 1 लाख, चाहते भडकले

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या