JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मी निवृत्ती घेतलीय, सुरेश रैनाने शाहीद आफ्रिदीला केलं ट्रोल; VIDEO VIRAL

मी निवृत्ती घेतलीय, सुरेश रैनाने शाहीद आफ्रिदीला केलं ट्रोल; VIDEO VIRAL

लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये रैनाने पत्रकार परिषदेत जाहीरपणे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला ट्रोल केलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 मार्च : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना त्याच्या खेळासोबतच हजरजबाबीपणासाठी ओळखला जातो. लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये रैनाने पत्रकार परिषदेत जाहीरपणे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीला ट्रोल केलं. आता याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरेश रैनाने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीनंतर काही मिनिटांनी रैनानेसुद्धा निवृत्तीची घोषणा केली होती. जेव्हा रैनाला निवृत्ती मागे घेण्याबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने उत्तर देताना आफ्रिदीला ट्रोल केलं. सुरेश रैना म्हणाला, मी सुरेश रैना आहे, शाहीद आफ्रीदी नाही. मी निवृत्ती घेतली आहे. इतकंच बोलून रैना हसायला लागला. त्यावेळी पत्रकार परिषदेतही हशा पिकला. शाहीद आफ्रिदीने अनेकदा निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पुन्हा पाकिस्तानकडून खेळला. यामुळे त्याच्यावर टीकाही झाली होती. कसोटीनंतर वनडे मालिकेसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सज्ज; पहिली मॅच कधी, कुठे पाहता येईल?

संबंधित बातम्या

लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आता पुन्हा एकदा दिग्गज क्रिकेटर खेळताना दिसत आहेत. इंडिया महाराजाला १५ मार्च रोजी वर्ल्ड जायंट्सने तीन गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात सुरेश रैनाने ४१ चेंडूत ४९ धावा केल्या. रैनाने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. इंडिया महाराजाकडून गौतम गंभीर खेळला नाही. त्याच्या जागी हरभजन सिंहने नेतृत्व केलं. इंडिया महाराजाने २० षटकात ९ विकेट घेत १३६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वर्ल्ड जायंट्सने हे आव्हान १८.४ षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या