JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / शाहरुख खानने लतादीदींच्या अंत्यदर्शनावेळी फुंकर मारण्यामागे कारण आहे इस्लामिक परंपरेचं

शाहरुख खानने लतादीदींच्या अंत्यदर्शनावेळी फुंकर मारण्यामागे कारण आहे इस्लामिक परंपरेचं

इस्लामिक परंपरेनुसार, जेव्हा दुवा मागितली जाते तेव्हा दोन्ही हात छातीपर्यंत धरावे लागतात आणि अल्लाहला प्रार्थना केली जाते. एखाद्याच्या आरोग्यासाठी, कोणाच्या नोकरीसाठी किंवा एखाद्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी अशा प्रकारे दुवा मागितली जाते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 फेब्रुवारी: भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं काल (6 फेब्रुवारी) निधन झालं. मुंबईच्या शिवाजी पार्क (Shivaji park) मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (funeral) करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM modi), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेते आणि बॉलिवूडमधले कलाकार उपस्थित होते. अनेक अभिनेत्यांसह शाहरुख खाननेही (Shahrukh Khan) त्यांना शिवाजी पार्क येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्याने इस्लामिक पद्धतीने फुंकर मारुन दुवा मागितली आणि लतादीदींना शेवटचा निरोप दिला; मात्र त्याची ही कृती म्हणजे थुंकणं असल्याचा गैरसमज झाल्याने त्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल झाला आहे. शाहरुखने आधी दुवा मागून लतादीदींच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर त्याने मास्क काढून त्यांच्या पार्थिवाच्या दिशेने वाकून इस्लामिक पद्धतीने फूक मारली. मग लतादीदींच्या पायाला स्पर्श करून आदरांजली वाहिली आणि हात जोडले. दरम्यान शाहरुखचा हा फोटो व्हायरल करुन अनेकांनी तो लतादीदींच्या पार्थिवावर थुंकला असल्याचंही म्हटलं आहे. परंतु तसं नाही. तर त्याच्या या कृतीमागे इस्लामिक परंपरा आहे. ही परंपरा काय आहे, हे जाणून घेऊ या. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलं आहे. इस्लामिक परंपरेनुसार, जेव्हा दुवा मागितली जाते तेव्हा दोन्ही हात छातीपर्यंत धरावे लागतात आणि अल्लाहला प्रार्थना केली जाते. एखाद्याच्या आरोग्यासाठी, कोणाच्या नोकरीसाठी किंवा एखाद्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी अशा प्रकारे दुवा मागितली जाते. दोन्ही हात जोडून प्रार्थना केल्याचे अनेक सीन तुम्ही चित्रपटांमध्ये (movies) पाहिले असतील. अगदी तसंच शाहरुख खानने लता दीदींच्या पार्थिवासमोर केलं होतं. लतादीदींच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी दुवा त्याने मागितली. ( CM योगींना जीवे मारण्याची खुलेआम धमकी; लेडी डॉनचं ट्विट व्हायरल, पोलीस सतर्क ) दरम्यान, त्याने तोंडावरचा मास्क (Mask) खाली सरकवून फुंकर मारली, त्याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या अर्थाने बातम्या पसरत आहेत. अनेक जण तो पार्थिवावर थुंकल्याचं म्हणत आहेत. ट्विटरवर भाजपच्या हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव यांनीही व्हिडिओ शेअर करताना हा प्रश्न उपस्थित केला होता. इस्लामिक परंपरेतून प्रार्थना करण्याची ही पद्धत सर्वसामान्य आहे. तुम्ही मशिदी किंवा दर्ग्यातही अशी दृश्यं पाहिली असतील. जेव्हा एखादा पालक आपल्या मुलासाठी मुफ्ती किंवा मौलानाकडे प्रार्थना करत असतो, ते प्रार्थना करतात आणि नंतर मुलावर फुंकर मारतात. मोठ्यांसाठीदेखील असं केलं जातं. दुवा कोणत्याही माणसासाठी केली जाते. दुवा मागितल्यानंतर अशा प्रकारे फुंकर मारली जाते. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली म्हणतात कि, जेव्हा कोणी आजारी असतं किंवा कोणाला नजर लागते तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी, तो बरा होण्यासाठी दुवा केली जाते. दुवा वाचून मारण्याला ‘दम’ करणं असंही म्हणतात. म्हणजे, एखाद्या आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना केली गेली असेल, तर ती प्रार्थना वाचल्यानंतर, आजारावर फूंकर मारली जाते. हा त्या प्रार्थनेचा परिणाम आजारी माणसाच्या शरीरापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे, असं मानलं जातं. दुवा करताना वाचलेल्या कुराणच्या आयताचा प्रभाव त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग आहे. आणखी एक, इस्लामिक तज्ज्ञ मुफ्ती अमजद यांनी सांगितलं कि, कुराणामध्ये असा उल्लेख आहे कि, काही व्यक्तीं फुंकर मारुन जादू करत असत. त्यांच्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी दुवा आणि फुंकर मारण्याची पद्धत स्वीकारली गेली. फुंकण्याचा उद्देश कुराणातल्या आयतांद्वारे एखाद्याला मदत करणं किंवा कोणत्याही दुःखातून मुक्त होणं, असा होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या