South Africa
नवी दिल्ली, 7 डिसेंबर: टीम इंडि(Team India)26 डिसेंबरपासून साउथ अफ्रीकाने दौऱ्यावर आहे. दरम्यान, यजमान टीमने टेस्ट सिरीजसाठी संघाची घोषणा केली आहे. संघामध्ये साउथ अफ्रीकाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. टेस्ट सिरीजसाठी साउथ अफ्रीकाने 21 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर डिओन ऑलिव्हरचे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. संघाचे नेतृत्व डीन एल्गर करणार आहे तर टेम्बा बौमा संघाचा उपकर्णधार असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जावे लागणार आहे. हा दौरा 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर पहिली कसोटी मालिका खेळवली जाईल आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळली जाईल.
एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याआधी सेंच्युरियन, जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथे कसोटी मालिकेतील तीनही सामने खेळवले जाणार आहेत.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने सिसांडा मगाला आणि रायन रिकेल्टन या दोन नवीन खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मगालाने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी एक एकदिवसीय आणि चार टी-20 सामने खेळले आहेत. याशिवाय रिकेल्टन हा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज असून त्याला संधी मिळाल्यास तो दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसेल. प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करणारा ऑलिव्हरही गोलंदाज असून त्याने आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 51 बळी घेतले आहेत. कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे नेतृत्व कागिसो राडाबा, एनरिक नोरखिया आणि केशव महाराज या त्रिकुटाकडे असेल. त्याचबरोबर कर्णधार एल्गर, डेकॉक, मार्कराम फलंदाजीत जोर देताना दिसणार आहेत. कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार असून 15 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यानंतर एकदिवसीय मालिका सुरू होईल, ज्यासाठी आफ्रिकन संघाची निवड होणे बाकी आहे.