JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / DJ Bravo:विराट आणि धोनीवर खास गाणं; तुम्ही मिस करू शकत नाही 'हा' व्हिडिओ

DJ Bravo:विराट आणि धोनीवर खास गाणं; तुम्ही मिस करू शकत नाही 'हा' व्हिडिओ

केवळ भारतीयच नव्हे तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्याने हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: कॅरेबियन बेटावरील क्रिकेटची स्टाईल ही वेगळीच आहे. जगातील अन्य क्रिकेटपटूंपेक्षा वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू हे हटकेच असतात. मैदानावर असो की मैदानाबाहेर त्यांची स्टाईल ही सर्वांचे लक्ष वेधत असते. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो हा देखील अशाच हटके स्टाईलसाठी ओळखला जातो. ब्राव्होची ओळख केवळ एक क्रिकेटपटू म्हणून नाही तर एक डीजे म्हणून देखली आहे. काही वर्षांपूर्वी ‘चॅम्पियन…चॅम्पियन’ या गाण्यामुळे तो  DJ Bravo या नावाने ओळखला जाऊ लागला. आता निवृत्तीनंतर तो ब्राव्हो पुन्हा एक नव गाणं घेऊन आला आहे. या गाण्यात ब्राव्होने आशिया खंडातील क्रिकेटपटूंचे कौतुक केले आहे. या गाण्यात त्याने भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघातील प्रमुख खेळाडूचे कौतुक केले आहे. ब्राव्होने भारतीय संघातील विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांना स्थान दिले आहे. केवळ भारतीयच नव्हे तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्याने हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या