मुंबई, 18 मार्च : कोरोना व्हायरसमुळे सध्या जगभर भीतीचं वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यामुळं अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन रद्द करण्यात आलं आहे. यामुळे सध्या टीम इंडियांची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिकाही रद्द केली गेली. तर आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू सध्या घरीच आहेत. आता सोशल मीडियावर भारताचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण यात चर्चा होत आहे ती केएल राहुलनं दिलेल्या सल्ल्याची. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या दृष्टीनं केएल राहुलनं हात धुवून या असं म्हटलं आहे. श्रेयस अय्यरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो सेल्फी क्लिक करताना दिसत आहे. याला कॅप्शन देताना त्यानं म्हटलं होतं की Expectation vs Reality. यामध्ये श्रेयस अय्यरनं पांड्यालाही टॅग केलं होतं. व्हिडिओत स्लाइड दिसत असून एका फोटोत दिसतं की श्रेयसच्या सेल्फीत जो हात आहे तो हार्दिक पांड्याचा होता. शेवटच्या स्लाइडमध्ये एक व्हिडिओ असून त्यात सेल्फीसाठी काय केलं हे सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या पोस्टवर टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज केएल राहुलची कमेंट आहे. त्यानं दोघांनाही हात धुण्याचा सल्ला दिला आहे. यात श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्याला टॅगही केलं आहे. बीसीसीआयने आयपीएलबाबत निर्णय घेताना खेळाडू, चाहते आणि कर्मचारी यांच्या आरोग्याला प्राधान्य दिल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच कोरोना पसरत असताना आयपीएलसारखी स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय देशांतर्गत असलेल्या क्रिकेट स्पर्धांही रद्द करण्यात आल्या आहेत. हे वाचा : कोरोनाला पळवण्यासाठी मुंबईकर श्रेयर अय्यरचा खास डान्स, VIDEO पाहिलात का?