JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / शाकिबचा पारा पुन्हा चढला... बांगलादेशच्या कॅप्टननं केली चाहत्याची धुलाई

शाकिबचा पारा पुन्हा चढला... बांगलादेशच्या कॅप्टननं केली चाहत्याची धुलाई

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा नेहमीच त्याच्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत येत असतो. काही दिवसांपूर्वीच एका सामन्यादरम्यान त्याने भर मैदानात अंपायर सोबत वाद घातला होता. तर आता त्याने चक्क आपल्या चाहत्यालाच मारहाण केली आहे.

जाहिरात

शाकिबचा पारा पुन्हा चढला... बांगलादेशच्या कॅप्टननं केली चाहत्याची धुलाई

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 मार्च :  बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन बांगलादेशमधील आजवरच्या सर्वोत्कृष्ट ऑल राउंडर क्रिकेटर्स पैकी एक आहे.  शाकिबच्या मैदानातील निडर खेळीमुळे त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. परंतु  शाकिब हा नेहमीच त्याच्या आक्रमक स्वभावामुळे चर्चेत येत असतो. काही दिवसांपूर्वीच एका सामन्यादरम्यान त्याने भर मैदानात अंपायर सोबत वाद घातला होता. तर आता त्याने चक्क आपल्या चाहत्यालाच मारहाण केली आहे. शाकिब अल हसनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तो रागात आपल्या एका चाहत्याची टोपीने धुलाई करताना दिसत आहे. झाले असे की, बांगलादेशने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर शाकिब एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. मात्र यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. IND VS AUS : केवळ 35 धावा करून हिटमॅनने नावावर केला मोठा रेकॉर्ड, दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान गर्दीला पांगवून शाकिब कसाबसा वाट काढत होता. परंतु याच दरम्यान एका चाहत्याने शाकिबच्या डोक्यावरील टोपी हिसकावून घेतली. यामुळे शाकिबला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने चाहत्याच्या हातातून त्याची टोपी परत घेत त्याच टोपीने चाहत्याच्या डोक्यात 3 ते 4 वेळा मारले.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी या प्रसंगावरून शाकिब अल हसनला ट्रॉल करीत आहेत. यापूर्वी देखील अनेकदा शाकिब अल हसनचा राग अनावर होऊन त्याने हिंसक कृती केली आहे. एकदा त्याने ढाका प्रीमियर लीगमध्ये सामना सुरु असताना बांगलादेशचा क्रिकेटर मुशफिकुर रहीम विरुद्ध विकेटची अपील केली होती.

परंतु तेव्हा अंपायरने शाकिबच्या विरुद्ध निकाल दिला. तेव्हा शाकिबचा राग अनावर होऊन त्याने ऑनफिल्ड अंपायरशी हुज्जत घातली. यावेळी शाकिब चांगलाच संतापला आणि त्याने स्टंपला लाथ मारली तसेच नंतर ते उखडले यावेळी गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या