शाहिन आफ्रिदीने केली अशी गोलंदाजी की स्टम्प ऐवजी तुटली बॅट Video Viral
मुंबई, 27 फेब्रुवारी : सध्या भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत काल पारपडलेल्या सामन्यात युवा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची ‘दादागिरी’ पाहायला मिळाली. या सामन्यात आफ्रिदीने अशी गोलंदाजी केली की स्टंप उडण्याच्या अगोदरच फलंदाजांची बॅट तुटली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 26 फेब्रुवारीच्या संध्याकाळी लाहोर कलंदर आणि पेशावर जाल्मी यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात लाहोर कलंदर संघाने प्रथम फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला 242 धावांचे आव्हान दिली. परंतु हे आव्हान पूर्ण करत असताना प्रतिस्पर्धी पेशावर जाल्मी संघाला अक्षरशः नाकीनऊ आले. लाहोर कलंदर च्या गोलंदाजांनी एकामागोमाग एक फलंदाज बाद केले अखेर पेशावर जाल्मी संघाचा 40 धावांनी पराभव केला. परंतु या सामन्यात युवा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची दहशत पाहायला मिळाली. Jasprit Bumrah : चाहत्यांना धक्का! आयपीएलमध्ये बुमराह खेळणार नाही? नेमकं काय घडलं? लाहोर कलंदरचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने पेशावर झल्मीला विजयापासून दूर ठेवण्यात मोठी भूमिका बजावली. त्याने सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये चेंडू हातात घेऊन प्रतिस्पर्धी संघाच्या स्पर्धकांना तंबूत धाडले. याच वेळी एक विलक्षण घटना घडली. शाहीन शाह आफ्रिदीने वेगात चेंडू टाकताच तो चेंडू समोरील खेळाडूच्या बॅटवर आदळला आणि त्याची बॅटच तुटली.
बॅट तुटल्यावर सर्वच आश्चर्य चकित झाले. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर शाहीनने फलंदाजांची विकेट देखील घेतली. शाहीन शाह आफ्रिदीने या सामन्यात तब्बल 5 विकेट घेतल्या.