JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / थेट मैदानात येऊन प्रेक्षकाने फुटबॉलपटूवर केला हल्ला!

थेट मैदानात येऊन प्रेक्षकाने फुटबॉलपटूवर केला हल्ला!

युरोप लीगमध्ये झालेल्या एका फुटबॉल सामन्यात एक विचित्र घटना घडली. यात सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाने थेट मैदानात धाव घेत गोलकिपरवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

जाहिरात

थेट मैदानात येऊन प्रेक्षकाने फुटबॉलपटूवर केला हल्ला

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 फेब्रुवारी : फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात या खेळाचे चाहते असून अनेकदा स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी आलेले चाहते आपल्या आवडत्या फुटबॉलपटूला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात धाव घेतात. चाहते खेळाडूंना भेटून त्यांना मिठी मारतात, हात मिळवतात तर अनेकदा पाया देखील पडतात. मात्र फुटबॉलच्या चालू सामन्यात एका प्रेक्षकाने थेट मैदानात येऊन फुटबॉलपटूला मारहाण केल्याची  घटना घडली आहे. युरोप लीगच्या फुटबॉल सामन्यात सेव्हिला आणि पीएसव्ही यांच्यात सामना सुरु होता. या सामन्यात सेव्हिला संघाचा गोल किपर मार्को दिमित्रोविक याच्यावर एका प्रेक्षकाने हल्ला केला. त्या हल्लेखोर प्रेक्षकाने दिमित्रोविकच्या अंगावर धावत जाऊन त्याच्या चेहऱ्यावर बुक्क्या मारल्या.  फुटबॉलपटूने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर काही काळ या दोघांमध्ये जबर हाणामारी देखील झाली. सध्या ह्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐन मुलाखतीत पाकिस्तानी क्रिकेटरने ओढले गाल, महिला अँकर सोबत घडली विचित्र घटना काही काळ हल्लेखोर प्रेक्षक आणि फुटबॉलपटूमध्ये हाणामारी झाल्यावर व्यवस्थापकांनी हल्लेखोराला बाहेर काढले. या हल्ल्याने फुटबॉलपटू मार्को दिमित्रोविक याला दुखापत झाली असून त्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याने सांगितले की, “माझ्यावर हल्ला करायचाच त्याचा हेतू होता, परंतु त्याने असे का केले हे मला जाऊन घ्यायचे आहे, मी माझ्या आयुष्यात याआधी असे कधीच अनुभवले नाही. मी हल्ल्याच्यावेळी  माझ्या रागावर नियंत्रण ठेवला नाहीतर हे प्रकरण अजून वाढले असते”.

संबंधित बातम्या

युरोप खंडात या फुटबॉल सामन्याचे आयोजन करणाऱ्या युएफाने याविषयी अद्याप सविस्तर निवेदन जाहीर केले नसले तरी, त्यांच्या वेबसाईटवर संबंधित घटनेबाबत चौकशी सुरु केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या