JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Korea Open 2023: सात्विक-चिरागची कमाल, वर्ल्ड नंबर वन जोडीला नमवत जिंकली कोरिया ओपन

Korea Open 2023: सात्विक-चिरागची कमाल, वर्ल्ड नंबर वन जोडीला नमवत जिंकली कोरिया ओपन

सात्विक आणि चिराग यांनी यंदा इंडोनेशिया सुपर १००९ आणि स्विस ओपन सुपर ५०० स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले आहे.

जाहिरात

सात्विक-चिरागने जिंकली कोरिया ओपन

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 23 जुलै : सात्विक-चिरागच्या जोडीने पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करत कोरिया ओपनच्या फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन जोडीला हरवलं. इंडोनेशियाची जोडी फजर अल्फियान आणि मोहम्मद रियान अर्दियांतो यांना हरवून सात्विक चिरागने कोरिया ओपनचं विजेतेपद पटकावलं. सात्विक-चिराग शेट्टी पहिल्या गेममध्ये १७-२१ ने हरले होते. पण त्यानंतर जोरदार मुसंडी मारत दुसरा गेम २१-१३ अशा फरकाने जिंकला. तर निर्णायक तिसऱ्या गेममध्ये २१-१४ अशी बाजी मारत विजेतेपदावर नाव कोरलं. सात्विक-चिराग यांचे सुपर ५०० मधलं हे तिसरं विजेतेपद आहे. भारतीय खेळाडू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सेमीफायनलमध्ये चीनच्या लियांग वी केंग आणि वांग चांग यांच्या जोडीला २१-१५, २४-२२ असं हरवून फायनलमध्ये धडक मारली होती. फायनलमध्ये या दोघांनी चमकदार कामगिरी करत वर्ल्ड नंबर वन जोडीला हरवलं. Harmanpreet Kaur : स्टम्पवर बॅट मारली, पंचांशी हुज्जत; सामन्यानंतर थेट आरोप, हरमनप्रीतला होऊ शकतो दंड सात्विक आणि चिराग यांनी यंदा इंडोनेशिया सुपर १००९ आणि स्विस ओपन सुपर ५०० स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले आहे. सात्विक आणि चिराग यांची जोडी जमल्यानंतर दोघांनी अनेक विजेतेपदांवर नाव कोरलंय. यात राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, थॉमस कपमध्ये सुवर्णपदक, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक याशिवाय इतर स्पर्धांमधील विजेतेपदांचा समावेश आहे. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर ही सहा टप्प्यांमध्ये असते. यात वर्ल्ड टूर फायनल्स, चार सुपर १००० टूर्नामेंट, सहा सुपर ७५० टुर्नामेंट, सात सुपर ५०० टुर्नामेंट आणि ११ सुपर ३०० टुर्नामेंट असतात. याशिवाय सुपर १०० असाही एक टप्पा असतो ज्यातून रँकिंगचे गुणही मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या