JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणार क्रिकेटच्या देवाचा पुतळा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणार क्रिकेटच्या देवाचा पुतळा

क्रिकेटचा देव अशी ख्याती असणारा भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा पूर्णा कृती पुतळा उभारण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे.

जाहिरात

वानखेडे स्टेडियमवर उभारला जाणार सचिनचा पुतळा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 फेब्रुवारी : क्रिकेटचा देव अशी ख्याती असणारा भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा येत्या 24 एप्रिल रोजी वयाची 50 वर्ष पूर्ण करणार आहे. तेव्हा त्यानिमित्ताने वानखेडे स्टेडीयममध्ये सचिन तेंडुलकर याचा पूर्णा कृती पुतळा उभारण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. सचिन तेंडुलकर याला 2014 मध्ये भारत सरकारकडून देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला होता. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत दमदार खेळी करून भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केले होते. त्याने मैदानात रचलेले बरेच रेकॉर्ड अजूनही कोणी तोडू शकलेले नाही.

सचिनने 16 नोव्हेंबर 2013 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना त्याने वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. यावेळी त्याने आपल्या गुरुजनांपासून ते क्रिकेटमधील सहकाऱ्यांपर्यंत सर्वांचे आभार मानले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, “वानखेडे स्टेडियमवर हा पहिलाच पुतळा असेल, तो कुठे ठेवायचा हे ठरवायचे आहे. सचिन तेंडुलकर एक भारतरत्न आहे. त्याने क्रिकेटसाठी काय केले हे सर्वांना माहीत आहे. तो 50 वर्षांचा झाल्यावर हे MCA कडून कौतुकाची भेट असले. मी तीन आठवड्यांपूर्वी त्याच्याशी बोललो आणि त्याची संमती घेतली.”

संबंधित बातम्या

सचिनने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिनच्या 50 व्या वाढदिवशी या पुतळ्याचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या