JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : ऑस्ट्रेलियाचं चॅलेंज स्वीकारत मास्टर-ब्लास्टर उतरला मैदानात, बॅटने असं दिलं उत्तर

VIDEO : ऑस्ट्रेलियाचं चॅलेंज स्वीकारत मास्टर-ब्लास्टर उतरला मैदानात, बॅटने असं दिलं उत्तर

सचिन मेलबर्नच्या मैदानावर आपल्या नेहमीच्या अंदाजात उतरला. याआधी सचिन क्रिकेटच्या मैदानावर ज्या शैलीत खेळायचा त्याच शैलीत यावेळीही खेळताना दिसला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेलबर्न, 09 फेब्रुवारी**:** शतकांचं शतक ठोकणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण, आज असं काही घडलं की, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बॅट हाती घ्यावी लागली आणि प्रतिस्पर्ध्यांसोबत दोन हात करावे लागले. सचिन नुसताच मैदानावर उतरला नाही तर, त्याने समोरच्या संघाला आपल्या बॅटने नेहमीप्रमाणे उत्तर दिलं. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज एलिस पॅरीने सचिन तेंडुलकरला आव्हान दिलं होतं. सचिन तेंडुलकरनेही हे आव्हान स्वीकारलं. दरम्यान, इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये टी20चा सामना सुरू असताना सचिनने फलंदाजी केली. सचिन मेलबर्नच्या मैदानावर आपल्या नेहमीच्या अंदाजात उतरला. याआधी सचिन क्रिकेटच्या मैदानावर ज्या शैलीत खेळायचा त्याच शैलीत यावेळीही खेळताना दिसला.

चौकार लगावला आणि उघडलं खातं मैदानावर खेळताना सचिन तेंडुलकरची एक वेगळीच शैली त्याच्या फॅन्सने पाहिली आहे. अशीच काहीशी शैली यावेळी देखील पाहायला मिळाली. याच शैलीसाठी सचिनची ओळख क्रिकेट विश्वामध्ये आहे. सचिनने एलिस पॅरीच्या गोलंदाजीवर चौकार लगावून आपलं खातं उघडलं. एलिस पॅरीनं सचिनच्या शरीरावर बॉल टाकला, यावेळी सचिनने चौकार लगावला. पॅरीची ही ओव्हर खेळण्याआधी सचिनने चांगला सराव केला होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सचिनने मेलबर्न मैदानातील इनडोर स्टेडिअममध्ये खूप वेळ फलंदाजीचा सराव केल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. तर, ब्रायन लारानेही तुफान फलंदाजी केली. लारानं 11 चेंडूमध्ये 30 धावा ठोकल्या.

सचिन मैदानावर उतरला की, क्रिकेट चाहत्यांची नजर त्याच्यावर खिळलेली असायची. तो मैदानावर असेपर्यंत त्याचा संपूर्ण खेळ त्याचे फॅन्स आवर्जुन पाहायचे. उत्तम फटकेबाजी करत धावा गोळा करण्याची एक वेगळीच शैली सचिनकडे असल्यामुळे अनेक युवा खेळाडूंनीही त्याच्या खेळीमधून धडे घेतले. आज पुन्हा सचिन मैदानावर उतरल्यामुळे सर्वांनाच त्याची फलंदाजी पुन्हा पाहायला मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या