rohit sharma and pujara
दिल्ली, 19 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान, पुजाराला वाचवण्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्माने स्वत:ची विकेट गमावली. रोहित शर्मा 20 चेंडूत 31 धावांवर फलंदाजी करत होता. सातव्या षटकात रोहित आणि पुजारा यांच्यात पाचव्या चेंडूवर धाव घेताना गोंधळ उडाला आणि रोहित शर्माला धावबाद व्हावं लागलं. कुह्नेमनच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने ऑन साइड स्क्वेअरला चेंडू टोलावला. पहिली धाव घेतल्यानतंर रोहित शर्मा दुसरी धाव घेण्यासाठी वळला. तेव्हा पुजारा नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेने धावत सुटला. तर रोहित शर्मा मात्र मधेच जाऊन थांबला. तोपर्यंत पुजारा अर्ध्याहून अधिक क्रीज पार करून पुढे आला होता. हेही वाचा : जडेजाच्या फिरकीसमोर कांगारुंचे लोटांगण, 6 जण बोल्ड; कपिल देव यांचा विक्रम मोडला रोहित शर्माला मागे वळण्याची संधी होती पण त्याने असं न करता थेट पॅव्हेलियनचा रस्ता धरला. यामुळे पुजारा बाद न होता मैदानात खेळू शकला. रोहित शर्माची यामध्ये चूक असली तरीही त्याला मागे वळण्याची संधी असताना केलेल्या त्यागामुळे आता चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर केएल राहुल अन् विराट कोहली, श्रेयस अय्यर हेसुद्धा लवकर बाद झाले. विराट कोहली 20 धावांवर बाद झाला. तर केएल राहुल पुन्हा फ्लॉप ठरला. श्रेयस अय्यरला फक्त 12 धावा करता आल्या. चेतेश्वर पुजाराने एस भरतच्या साथीने अभेद्य भागिदारी करत भारताला विजय मिळवून दिला. पुजाराने 74 चेंडू खेळताना नाबाद 31 धावा केल्या. तर एस भरतने 22 चेंडूत 23 धावा केल्या.