JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / चर्चा तर होणारच! Ruturaj Gaikwad म्हणतोय, 'Give love back'

चर्चा तर होणारच! Ruturaj Gaikwad म्हणतोय, 'Give love back'

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून ( CSK) तुफानी फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सध्या त्याच्या एका प्रेमाच्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

जाहिरात

Ruturaj Gaikwad

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 डिसेंबर: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून ( CSK) तुफानी फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) काही दिवसांपूर्वी विजय हजारे ट्रॉफीत चमकदारी कामगिरी करून सर्वांचं लक्ष वेधून घेतले. आपल्या धडाकेबाज खेळीने सर्वाच्या मनावर राज्य करणारा हा पुणेकर ऋतुराज सध्या एका नव्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. त्याने इंस्टावर एक पोस्ट केली असून तो प्रेम परत मागत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना तो नक्की कोणाकडे प्रेम परत मागत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे तर काही फॅन्स त्याला दादा लवकर लग्न कर असा सल्ला देत आहेत. विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्र संघाचं (Maharashtra Cricket Team) नेतृत्व करणाऱ्या ऋतुराजनं सलग तीन सामन्यात शतक झळकावले. त्याच्या या कामगिरीचे कौतुक सुरु असतानाच त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो बिग बॉस मराठी सीझन 3 फेम स्नेहा वाघची ‘सरांगे बिग बॉस’ ही अॅक्शन मारताना दिसत आहे. पण त्याने कॅप्शनमध्ये ‘Give love back’ असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या

त्यामुळे चाहते थोडे बुचकळ्यात पडले आहेत. तो नक्की कोणाकडे प्रेम परत मागत आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी कमेंट करत दादा लवकर लग्न कर असा सल्ला दिला आहे. तर काही युजर्सनी Future Indian Legend अशी कमेंट केली आहे. तसेच त्याच्या अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. मागील वर्षापासून क्रिकेट जगतात आणि मराठी सिनेसृष्टीत गोड चेहरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सायली संजीव आणि त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. ऋतुराजने या सर्व गोष्टी फेटाळल्या असल्या तरी सायलीच्या प्रत्येक पोस्टवर ऋतु की राणी अशी कमेंट ही असतेच. भारताचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएल 2021मध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळताना त्यानं सर्वाधिक 635 धावा केल्या होत्या. चेन्नईच्या विजयात ऋतुराजची महत्वाची भूमिका होती. त्यानं फाफ डुप्लेसिस सोबत चेन्नईला चौथे विजेतेपद मिळून देण्यात मोठा हातभार लावलाय. यामुळंच चेन्नईच्या संघानं ऋतुराजला पुढील हंगामासाठी रिटेन देखील केलंय.

‘सरांगे’ म्हणजे काय?

सरांगे हा एक कोरियन शब्द आहे. सरांगे याचा अर्थ ‘आय लव्ह यू’ असा होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या