रिषभ पंतच्या हेअल्थ बाबत मोठी माहिती अपडेट; स्वतः शेअर केला व्हिडिओ
मुंबई, 15 मार्च : भारताचा स्टार युवा क्रिकेटर रिषभ पंत सध्या दुखापतग्रस्त आहे. 30 डिसेंबर रोजी त्याच्या कारला भीषण अपघात झाल्यामुळे रिषभ देखील गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे रिषभवर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. आता रिषभ पंत या दुखापतीतून बरा होत असून त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मागील वर्षी कार अपघात गंभीर जखमी झालेल्या रिषभ पंत च्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रिषभच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना त्याने आपला एक विडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात रिषभ स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये चालण्याची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. या व्हिडिओला रिषभने, “सर्व लहान मोठ्या अशा प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ आहे” असे कॅप्शन दिले.
IND vs AUS ODI : मुंबईत येताच वॉर्नरची नेट प्रॅक्टिस सुरू, गल्लीत लहान मुलांसोबत सराव, Video रिषभच्या या व्हिडिओवर त्याचे चाहते आणि सह खेळाडू लाईक करून कमेंट करीत आहेत. यापूर्वी देखील रिषभ पंतने गार्डनमध्ये कुबड्यांच्या सहाय्याने चालत असतानाचा फोटो शेअर केला होता.