JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WPL 2023 : पाचही मॅच हरलेली स्मृती मानधनाची RCB प्ले ऑफमध्ये पोहोचणार? असं आहे प्ले ऑफचं गणित...

WPL 2023 : पाचही मॅच हरलेली स्मृती मानधनाची RCB प्ले ऑफमध्ये पोहोचणार? असं आहे प्ले ऑफचं गणित...

स्मृती मानधनाचा आरसीबी संघ महिला आयपीएलमध्ये सलग पाच सामने हरला. परंतु 5 वेळा पराभव पदरात पडूनही आरसीबीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो.

जाहिरात

पाचही मॅच हरलेली स्मृती मानधनाची RCB प्ले ऑफमध्ये पोहोचणार? असं आहे प्ले ऑफचं गणित...

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मार्च : सध्या भारतात महिला प्रीमियर लीग स्पर्धा सुरु असून यात दररोज रोमांचकारी सामने पाहायला मिळत आहेत. मंगळवारी मुंबई इंडियन्स संघ महिला आयपीएलमधील पाचही सामने जिंकून WPL च्या प्ले ऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला. परंतु त्याउलट स्मृती मानधनाचा आरसीबी संघ महिला आयपीएलमध्ये सलग पाच सामने हरला. परंतु 5 वेळा पराभव पदरात पडूनही आरसीबीचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो. कर्णधार स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघ महिला आयपीएलचे सामने खेळत आहे. स्मृती, एलिस पेरी, रिचा घोष यासारख्या जगभरातील अनेक जबरदस्त महिला क्रिकेटर्सना आरसीबी फ्रेंचायजीने आपल्या संघात घेतले. परंतु असे असताना देखील महिला आयपीएलमध्ये आरसीबीला सलग पाच सामन्यात पराभव पत्करावा लागला. सध्या महिला आयपीएलच्या पॉईंट टेबलवर देखील आरसीबीचा संघ शेवटच्या स्थानी आहे. परंतु अशा स्थितीत देखील आरसीबी संघासाठी प्ले ऑफची दार अद्याप बंद झालेली नाहीत. Rishabh Pant : रिषभ पंतच्या हेल्थबाबत मोठी अपडेट, स्वतः शेअर केला व्हिडिओ

आरसीबीच्या महिला संघाला जर प्ले ऑफमध्ये पोहोचायचं असेल तर संघाला पुढील सर्व ३ सामने जिंकावे लागतील. यासोबतच आरसीबीचे प्ले ऑफमध्ये जाणे केवळ त्यांच्यावरच नाही तर इतर संघांवरही अवलंबून असेल. आरसीबीला प्ले ऑफ मध्ये पोहोचायचे असेल तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलला त्यांचे गुजरात जाएंट्स आणि यूपी वॉरियर्स सोबत असलेले सामने जिंकावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या