RCB च्या सलग दुसऱ्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
मुंबई, ७ मार्च : सध्या भारतात महिला प्रीमियर लीग स्पर्धा सुरु असून या अंतर्गत काल मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांमध्ये सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने आरसीबी संघावर सलग 9 विकेट्सने विजय मिळवला. WPL मध्ये आरसीबी संघाला सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर आरसीबीचा महिला संघ देखील पुरुषांप्रमाणेच पराभवाची मालिका सुरु ठेवत असल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मिम्सस शेअर केले.
सध्या हे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण याचा आनंद घेत आहेत.