JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जडेजाने हे काय केलं? ऑस्ट्रेलियन मीडिया अन् खेळाडूंनी विचारला प्रश्न; पाहा VIDEO

जडेजाने हे काय केलं? ऑस्ट्रेलियन मीडिया अन् खेळाडूंनी विचारला प्रश्न; पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या जडेजाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर वाद सुरू झाला होता. अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना याला बॉल टेम्परिंगशी जोडण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात

ravindra jadeja viral video

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 10 फेब्रुवारी : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजाने सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. जडेजाने जबरदस्त पुनरागमन करताना पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट घेतल्या. मात्र त्याच्या एका कृतीवर संशय व्यक्त करताना ऑस्ट्रेलियन माध्यमे आणि माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रविंद्र जडेजाने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडून एक क्रीम घेऊन ती बोटाला लावली. त्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचा संबंध ऑस्ट्रेलियन मीडिया आणि माजी क्रिकेटपटूंनी बॉल टेम्परिंगशी जोडला. यावर मॅच रेफ्रींनी भारतीय संघाला विचारले होते, तेव्हा याबाबत योग्य ती माहितीही रेफ्रींना देण्यात आली होती. हेही वाचा :  फलंदाजांना नाचवणाऱ्या खेळपट्टीवर हिटमॅनचं शतक, शतकानंतर स्टीव्ह स्मिथनेही दिली दाद भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी रविंद्र जडेजाने बोटाला काही लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर जडेजा आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माला मॅच रेफ्री एंडी पायक्रॉफ्ट यांनी विचारणा केली होती. व्हिडीओच्या माध्यमातून याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण यात काही चुकीचं न आढळल्यानं जडेजावर कोणताही दंड लावण्यात आला नाही.

संबंधित बातम्या

मॅच रेफ्रींनी स्पष्ट केलं की, जडेजाने त्याच्या बोटावर पेन किलर क्रीम लावली होती. जडेजाने नागपूर कसोटीच्या पहिल्या दोन सत्रातच २२ षटके गोलंदाजी केली होती. सहा महिन्यांनी पुनरागमन केल्यानं त्याच्या बोटांमध्ये वेदान होणं ही मोठी बाब नाही. या वेदना कमी व्हाव्या यासाठी त्याने मोहम्मद सिराजकडून क्रीम घेऊन ती बोटांना लावली होती. हेही वाचा : धोनी, विराटलाही जमलं नाही; रोहितने शतक झळकावत घडवला इतिहास पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज रविंद्र जडेजाने बाद केले. जडेजाने क्रीम लावली तेव्हा त्यानं १५ षटके टाकली होती. यात स्टिव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन आणि मॅट रेनशॉ यांना तंबूत धाडलं होतं. ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतला होता. जडेजाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर वाद सुरू झाला होता. अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना याला बॉल टेम्परिंगशी जोडण्याचा प्रयत्न केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या