JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / जडेजाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला फक्त 24 तासांसाठी केलं फॉलो, काय आहे कारण?

जडेजाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला फक्त 24 तासांसाठी केलं फॉलो, काय आहे कारण?

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजा इन्स्टाग्रामवर कोणालाच फॉलो करत नाही, मात्र त्याने 24 तासांसाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरला फॉलो केलं आहे.

जाहिरात

jadeja and nathan lyon

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 20 फेब्रुवारी : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्या दोन्ही सामन्यात जबरदस्त अशी कामगिरी केलीय. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले. तर दोन्ही वेळा जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. दरम्यान, दिल्ली कसोटीवेळी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नाथन लायनने क्रिकेटच्या मैदानाबाहेरच्या मुद्द्यावर जडेजासोबत चर्चा केली होती. त्यानतंर जडेजाने नाथन लायनला इन्स्टाग्रामवर 24 तासांसाठी फॉलो केलं आहे. दिल्ली कसोटीवेळी नाथन लायनने रविंद्र जडेजाला म्हटलं होतं की, तु इन्स्टाग्रामवर मला फॉलो करत नाहीस, मी तुझ्या फॉलो बॅकची वाट पाहतोय. तसंच कुणालाच फॉलो करत नाहीस, मला फॉलो करशील का असा प्रश्नही विचारला होता. हेही वाचा :  Womens T20 WC : दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले, भारताकडे आज शेवटची संधी नाथन लायनसोबत झालेल्या चर्चेनंतर जडेजाने इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याला पुढच्या 24 तासांसाठी फॉलो केलं. नाथन लायनला फॉलो केल्यानंतर जडेजाने याची माहिती इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दिली. jadeja and nathan lyon

jadeja and nathan lyon

दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या तर भारताचा पहिला डाव 262 धावात संपुष्टात आला होता. त्यानतंर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला भारताने 113 धावात गुंडाळलं होतं. या डावात जडेजाने 7 तर अश्विनने 3 विकेट घेतल्या होत्या. यानंतर 115 धावांचे आव्हान भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करून ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या