रॉबिन इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.
शिखा श्रेया, प्रतिनिधी रांची, 26 जून : ज्याचे देश-विदेशात करोडो चाहते आहेत. ज्याला लाखो तरुण देव मानतात असा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची नुसती एक झलक पाहण्यासाठी असंख्य लोक तडपतात. झारखंडच्या रांचीने भारताला हा हिरा दिला. आता याच रांचीच्या मातीतून आणखी एक तरुण क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावण्यास सज्ज झाला आहे. ज्याचं नाव आहे रॉबिन मिंझ. येत्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याला खेळताना पाहायला मिळेल. लवकरच आयपीएलच्या सरावासाठी रॉबिन इंग्लंडला रवाना होणार आहे. दरम्यान, रॉबिन मिंझ हा पहिला आदिवासी खेळाडू आहे. 2002 साली जन्म झालेल्या 20 वर्षीय रॉबिनला लहानपणासूनच क्रिकेटची आवड होती. वयाच्या नवव्या वर्षी त्याने क्रिकेट खेळणास सुरुवात केली. त्याचं हे कौशल्य सर्वात आधी त्याच्या वडिलांनी ओळखलं होतं. ते लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी जेव्हा रॉबिनला खेळताना पाहिलं तेव्हाच त्यांनी एका क्रिकेट अकादमीत त्याला प्रवेश मिळवून दिला आणि रॉबिनचा स्वप्नांच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
रॉबिनने क्रिकेटसाठी कुटुंबियांकडून प्रचंड प्रोत्साहन मिळाल्याचं सांगितलं. वडील लष्करात असताना आईच त्याला क्रिकेट अकादमीत घेऊन जायची. त्याचं शिक्षण दहावीपर्यंत झालं असून त्यापुढे क्रिकेटमुळे शिक्षणासाठी वेळ देता आला नाही. त्याला एक लहान आणि एक मोठी अशा दोन बहिणीदेखील आहेत. त्यांचं शिक्षण सध्या सुरू आहे. तर, रॉबिन हा सध्या रांचीमध्ये नामकुमच्या सोनेट क्रिकेट क्लबमधून क्रिकेट खेळतो. तो एक उत्तम यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. धोनीचा चाहता असल्याने त्याच्याच पावलावर पाऊल ठेवायचं त्याने ठरवलंय. आशियातील सर्वात उंच झाड; शास्त्रज्ज्ञांनी या ठिकाणाहून काढलं शोधून महत्त्वाचं म्हणजे ‘मला लखनऊ सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने ट्रायलसाठी बोलवलं होतं. मी दिल्ली कॅपिटल्ससाठी ट्रायल सामना खेळलो होतो, मात्र तेव्हा माझी निवड झाली नाही. त्यावेळी मी खूप निराश झालो होतो. मात्र माझ्या प्रशिक्षकांनी मला समजावलं आणि मी पुन्हा नव्याने सुरुवात केली. माझ्या या यशात माझे प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य आणि हासिफ सरांचा सर्वात मोठा वाटा आहे. या दोघांनी सुरुवातीपासूनच माझ्यावर विश्वास दाखवला. मला प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने शिकवली. त्यांनीच मला मेहनत करायलाही शिकवलं. स्वतःवर मेहनत करण्यासाठी मला आत्मविश्वास दिला’, अशा भावना रॉबिनने व्यक्त केल्या.