JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Cricket : IPL सुरु असताना राहुल द्रविड मालदीवमध्ये करतोय धमाल, Video

Cricket : IPL सुरु असताना राहुल द्रविड मालदीवमध्ये करतोय धमाल, Video

आयपीएलच्या या झगमगाटापासून लांब राहून भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या मालदीवमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

जाहिरात

IPL सुरु असताना राहुल द्रविड मालदीवमध्ये करतोय धमाल Video

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 एप्रिल : सध्या भारतात जगप्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. दररोज स्पर्धेत रोमांचक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत असून देश विदेशातील क्रिकेटस्टार्स आयपीएलच्या मैदानावर तुफान कामगिरी करताना दिसत आहे. परंतु आयपीएलच्या या झगमगाटापासून लांब राहून भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या मालदीवमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या त्याच्या कुटुंबासोबत मालदीव दौऱ्यावर गेला आहे. Roadies फेम निखिल चिन्नप्पा याने राहुलच्या मालदीव व्हिजिटचे काही फोटोस सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात राहुल मालदीवच्या समुद्रात स्कुबा डायविंगचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. तर कुठे आपल्या कुटुंबासह तेथील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत आहे.

संबंधित बातम्या

राहुल द्रविडचे मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते यावर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या