JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / 2021 मध्ये या खेळाडूंनी मारले सर्वाधिक सिक्सर, टॉप-5 मधून 3 आहेत भारतीय, पाहा लिस्ट

2021 मध्ये या खेळाडूंनी मारले सर्वाधिक सिक्सर, टॉप-5 मधून 3 आहेत भारतीय, पाहा लिस्ट

New Year 2022 : कसोटीमध्ये प्रत्येक फलंदाजाला शिस्तबद्ध आणि संयमी खेळ करायला आवडतं. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू मोठ्या प्रमाणात चौकार मारत असतात. सिक्स मारण्याच्या भानगडीत ते पडत नाही, कारण त्यात आऊट होण्याची शक्यता जास्त असते.

0106

2021 हे वर्ष संपलं पण त्यात क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवले गेले. 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमध्येही काही धडाकेबाज फलंदाजांनी आपल्या बॅटिंगने क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केलं. त्यात नवीन खेळाडूंपासून दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळं आता 2021 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 खेळाडूंची माहिती घेऊयात.

जाहिरात
0206

2021 साली कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 फलंदाजांच्या यादीत भारताचा शुभमन गिल 5 व्या क्रमांकावर आहे. गिलने यावर्षी 9 कसोटी सामने खेळले आणि या फॉरमॅटमध्ये त्याने 17 डावात 8 षटकार ठोकले आहेत. त्याने यावर्षी कसोटीत एकूण 478 धावा केल्या.

जाहिरात
0306

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने यावर्षी कसोटी क्रिकेटला अलविदा केलेलं आहे पण या यष्टिरक्षक फलंदाजाने 2021 मध्ये चांगली कामगिरी केली. त्याने या फॉरमॅटमध्ये एकूण 6 कसोटी सामने खेळले आणि 10 डावात 348 धावा केल्या. 2021 मध्ये त्याने या फॉरमॅटमध्ये एकूण 8 षटकार मारले होते त्यामुळं तो या लिस्टमध्ये क्रमांक 4 वर आहे.

जाहिरात
0406

वेस्ट इंडिजच्या काइल मेयर्सने 2021 मध्ये एकूण 10 कसोटी सामने खेळले आणि 20 डावात 10 षटकार मारले. त्याची सरासरीही 35 च्या जवळपास होती आणि त्याने एक द्विशतकही ठोकलेलं आहे. 2021 मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0506

भारताचा स्टार फलंदाज आणि प्रसिद्ध हिटमॅन रोहित शर्माने 2021 मध्ये 11 कसोटी सामने खेळले आणि 21 डावात 906 धावा केल्या. त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकावलेली आहेत. त्याने यावर्षी कसोटीत 11 षटकार मारले असून तो यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

जाहिरात
0606

भारताचा स्टार यष्टीरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाज ऋषभ पंतने 2021 मध्ये एकूण 12 सामने खेळले आणि 1 शतक, 5 अर्धशतकांच्या मदतीने 748 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने एकूण 15 षटकार मारले असून तो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या