JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Pro Kabaddi League : कोल्हापूरचा पठ्ठ्या सज्ज, 'करोडपती' सिद्धार्थ पुन्हा मैदान गाजवणार!

Pro Kabaddi League : कोल्हापूरचा पठ्ठ्या सज्ज, 'करोडपती' सिद्धार्थ पुन्हा मैदान गाजवणार!

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या मोसमाला बुधवार 22 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. लीगच्या पहिल्याच दिवशी दोन करोडपती खेळाडू मैदानात उतरणार आहेत. यूपी योद्धानी प्रदीप नरवालला (Pradeep Narwal) तब्बल 1.65 कोटी रुपये देऊन लिलावात विकत घेतलं. तर कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईवर (Siddharth Desai) तेलुगू टायटन्सने 1 कोटी 30 लाखांची बोली लावली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बैंगलुरू, 21 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) आठव्या मोसमाला बुधवार 22 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. पहिल्याच दिवशी तीन सामने होणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा बायो-बबलमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय खेळवली जाईल. स्पर्धची सुरूवात माजी चॅम्पियन यू मुंबा आणि बैंगलुरू बूल्स यांच्यातल्या सामन्याने होणार आहे. तर दुसरा मुकाबला तेलुगू टायटन्स (Telugu Titans) आणि तामीळ थलायवाज यांच्यात आणि तिसरा सामना यूपी योद्धा आणि गतविजेत्या बंगाल वॉरियर्सशी होईल. प्रो कबड्डी लीगच्या पहिल्याच दिवशी दोन करोडपती खेळाडू मैदानात उतरणार आहेत. यूपी योद्धानी प्रदीप नरवालला (Pradeep Narwal) तब्बल 1.65 कोटी रुपये देऊन लिलावात विकत घेतलं, याचसह तो लीगच्या इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू झाला. तर कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईला (Siddharth Desai) तेलुगू टायटन्सने 1 कोटी 30 लाखांची बोली लावून टीममध्ये घेतलं. सिद्धार्थला रिटेन करण्यासाठी टायटन्सला एफबीएम कार्डचा वापर करावा लागला. सिद्धार्थ देसाईची बेस प्राईज 30 लाख रुपये होती. मागच्या लिलावाच्या तुलनेत सिद्धार्थ देसाईला कमी रक्कम मिळाली. 2019 च्या लिलावात तेलुगू टायटन्सने त्याला 1.45 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. 2018 च्या मोसमात सिद्धार्थला यू मुंबाने फक्त 36.4 लाख रुपयांना खरेदी केली होतं. या मोसमात त्याने धमाकेदार कामगिरी केल्यामुळे पुढच्या लिलावात त्याच्यावर कोट्यवधींची बोली लागली. कोण आहे सिद्धार्थ देसाई? सिद्धार्थ देसाई कोल्हापूरच्या चंदगडचा रहिवासी आहे. प्रो कबड्डी लीग सुरू व्हायच्या आधीही सिद्धार्थचा संपूर्ण फोकस हा खेळावरच होता. ‘मी सुरुवातीला कबड्डी खेळायचो, पण व्यावसायिक नाही. मातीच्या कोर्टात मी स्थानिक स्पर्धा खेळल्या. जेव्हा प्रो कबड्डी लीग सुरू झाली तेव्हा मी खेळाला गांभिर्याने घ्यायला लागलो. प्रशिक्षण घेण्यासाठी मी पुण्याच्या क्लबमध्ये गेलो,’ असं सिद्धार्थ देसाईने सांगितलं. आधीपासूनच फिटनेसला महत्त्व देत असल्यामुळे कबड्डी खेळताना त्याला याचा फायदा झाला. ‘मी दहावीत असल्यापासूनच फिटनेससाठी वेडा होतो. मला चांगलं आणि फिट दिसायचं होतं. मी फिटनेस खेळासाठी करत नव्हतो. मी जिममध्ये खूप वर्क आऊट आणि ट्रेनिंग करायचो,’ अशी प्रतिक्रिया सिद्धार्थने दिली. सिद्धार्थचे वडील आणि मोठा भाऊ देखील कबड्डी खेळायचे, त्यामुळे सिद्धार्थनेही कबड्डी खेळायला सुरुवात केली. अभ्यासासोबतच तो लोकल क्लब आणि स्पर्धांमध्ये कबड्डी खेळायचा. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने व्यावसायिक कबड्डी खेळण्याचा निर्णय घेतला. 2018 साली त्याची महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झाली. यादरम्यान त्याने सीनियर नॅशनल ट्रॉफीचा किताब पटकावला. यानंतर लगेचच प्रो कबड्डी लीगच्या लिलावात तो सहभागी झाला. पहिल्याच मोसमात यू मुंबाने त्याला 36.4 लाखांमध्ये विकत घेतलं. ही रक्कम त्याच्या बेस प्राईजच्या 5 पट जास्त होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या