दिल्लीच्या नवीन कुमारने या मॅचमध्ये एक मोठा रेकॉर्ड केला (फोटो PKL)
मुंबई, 25 डिसेंबर : प्रो कबड्डी लीगच्या आठव्या सिझनची (Pro Kabaddi League) दमदार सुरूवात करणाऱ्या यू मुंबाला (U Mumba) पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये दबंग दिल्लीनं (Dabang Delhi) मुंबाचा 31-27 ने पराभव केला. या मॅचच्या फर्स्ट हाफमध्ये मुंबईची टीम आघाडीवर होती, पण त्यांना या आघाडीचा फायदा घेता आला नाही. पहिला हाफ मुंबईचा बंगळुरूमध्ये झालेल्या या मॅचमध्ये अभिषेक सिंग (Abhishek Singh) आणि व्ही. अजित कुमार यांनी मुंबाला दमदार सुरूवात करून दिली. त्यांच्या कामगिरीने मुंबानं सुरुवातीला 5-2 अशी आघाडी मिळवली. या जोडीच्या खेळामुळे दिल्लीची टीम झटपट ‘ऑल आऊट’ झाली. त्यानंतर दिल्लीचे मेन रायडर नवीन कुमारनं (Naveen Kumar) 4 झटपट पॉईंट्स घेत ही आघाडी कमी केली. राखीव खेळाडू म्हणून मॅटवर उतरलेल्या मुंबाच्या शिवम अनिलनं शेवटच्या क्षणी पुन्हा जोरदार खेळ केला. त्याने नवीन कुमारला ‘सुपर टॅकल’ केले. त्यामुळे पहिल्या हाफनंतर मुंबाकडे 12-10 अशी आघाडी होती. सेकंड हाफमध्ये दिल्ली दमदार मुंबाच्या अनिल आणि अभिषेकनं सेकंड हाफच्या सुरुवातीलाही वर्चस्व गाजवले. त्यांच्या खेळामुळे मुंबानं आघाडी 19-10 पर्यंत वाढवली होती. त्यानंतर दिल्लीच्या नवीन कुमारनं जोरदार खेळ केला. नवीनला दिल्लीच्या डिफेंडर्सनंही साथ देत मॅचमध्ये 20-20 ने बरोबरी साधली. या बरोबरीनंतरही दोन्ही टीममध्ये शेवटपर्यंत विजयासाठी झुंज झाली. पण अखेर दिल्लीनं 31-27 असा विजय मिळवला. दिल्लीचा हा स्पर्धेतील सलग 5 वा विजय असून त्यामुळे ही टीम स्कोअरमधील फरकाच्या आधारानं पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर आहे.
नवीन कुमार दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने 16 रेड पॉईंट्स कमावले. प्रो कबड्डी लीगमध्ये सलग 23 व्या मॅचमध्ये नवीननं सुपर 10 ची कमाई केली आहे. तसेच स्पर्धेच्या इतिहासात 500 पॉईंट्सही पूर्ण केले आहेत. सर्वात कमी मॅचमध्ये (47) नवीननं हा टप्पा ओलांडला आहे.
मॅचचा निकाल : दिल्ली दबंग (31) विजयी विरुद्ध यु मुंबा (27) सर्वोत्तम रेडर : नवीन कुमार (दबंग दिल्ली) - 16 पॉईंट्स सर्वोत्तम डिफेंडर : जोगिंदर नरवाल (दबंग दिल्ली) - 4 पॉईंट्स