JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / PKL Final : दबंग दिल्लीने इतिहास घडवला, रोमांचक फायनलमध्ये पटणाचा एक पॉईंटने पराभव

PKL Final : दबंग दिल्लीने इतिहास घडवला, रोमांचक फायनलमध्ये पटणाचा एक पॉईंटने पराभव

प्रो कबड्डी लीगच्या फायनलमध्ये (PKL Final) दबंग दिल्लीने रोमांचक सामन्यात पटणा पायरट्सचा (Dabang Delhi vs Patna Pirates) 1 पॉईंटने पराभव केला आहे. याचसह दिल्लीने पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीगची (Pro Kabaddi League) ट्रॉफी जिंकली आहे.

जाहिरात

Photo-PKL

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बँगलोर, 25 फेब्रुवारी : प्रो कबड्डी लीगच्या फायनलमध्ये (PKL Final)  दबंग दिल्लीने रोमांचक सामन्यात पटणा पायरट्सचा (Dabang Delhi vs Patna Pirates) 1 पॉईंटने पराभव केला आहे. याचसह दिल्लीने पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीगची (Pro Kabaddi League) ट्रॉफी जिंकली आहे. दिल्लीने फायनलच्या या सामन्यात पटणाला 37-36 ने मात दिली. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही टीमनी रेडने 12-12 पॉईंट्स मिळवले तर टॅकलनेही दोघांना 2-2 पॉईंट्स घेण्यात यश आलं. ऑलआऊटसाठी पटणाला 2 पॉईंट्स मिळाले, ज्यामुळे त्यांना आघाडी घेण्यात यश आलं, पण दुसऱ्या हाफमध्ये त्यांना या आघाडीचा फायदा उचलता आला नाही. दिल्लीला 27 रेड पॉईंट्स, 2 सुपर रेड्स, 4 टॅकल, 2 ऑलआऊट आणि 4 एक्स्ट्रॉ पॉईंट मिळाले. तर पटणाने 29 रेड पॉईंट्स, 4 टॅकल, 2 ऑलआऊट आणि 1 एक्स्ट्रॉ पॉईंट मिळाला. दिल्लीकडून विजय मलिकने सर्वाधिक 14 तर नवीन कुमारने 13 पॉईंट्स केले. पटणाकडून सचिनला 10 आणि गुमान सिंगला 9 पॉईंट करण्यात यश आलं.

संबंधित बातम्या

तीनवेळा पीकेएल जिंकणाऱ्या पटणाने सेमी फायनलमध्ये तगड्या यूपी योद्धाचा पराभव केला होता. तर सिझन 7 ची उपविजेता असलेल्या दिल्लीनं बेंगलुरू बुल्सचा पराभव करत सलग दुसऱ्या सिझनमध्ये फायनल गाठली होती. पाटणाचा लीग स्टेजच्या दोन्ही मॅचमध्ये दिल्लीने पराभव केला होता, पहिल्या मॅचमध्ये ऑल राऊंडर संदीप नरवालनं जबरदस्त खेळ केला होता. तर दुसऱ्या मॅचमध्ये मंजीत छिल्लरनं हाई 5 करत दिल्लीला विजय मिळवून दिला. या दोन पराभवांचा बदला पटणा घेईल, असं वाटत होतं, पण एका पॉईंटने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या