JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पाकिस्तानचा रडीचा डाव; आशिया कप नको म्हणून भारताचं नाव केलं पुढे, पण खरं कारण समोर

पाकिस्तानचा रडीचा डाव; आशिया कप नको म्हणून भारताचं नाव केलं पुढे, पण खरं कारण समोर

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) रडीचा डाव पुन्हा एकदा समोर आला आहे. भारतीय टीम (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship) पोहोचली, तर आशिया कप (Asia Cup) रद्द करावा लागेल, असं वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख एहसान मणी (Ehsann Mani) यांनी केलं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लाहोर, 12 मार्च : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) रडीचा डाव पुन्हा एकदा समोर आला आहे. भारतीय टीम (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship) पोहोचली, तर आशिया कप (Asia Cup) रद्द करावा लागेल, असं वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख एहसान मणी (Ehsann Mani) यांनी केलं होतं. पण यानंतर लगेचच बीसीसीआयकडून प्रतिक्रिया आली होती. टीम इंडियाचं वेळापत्रक व्यस्त असलं, तरीही आपण महत्त्वाच्या खेळाडूंना न पाठवता नवोदितांना संधी देऊ असं बीसीसीआय (BCCI) कडून सांगण्यात आलं. यानंतर आता आशिया कप रद्द करण्यासाठी भारताचं नाव पुढे करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. पीएसएलसाठी (PSL) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला यावर्षी आशिया कप खेळवायचा नाही, अशी माहिती आता समोर आली आहे. याबाबत एहसान मणी यांनी पीएसएलच्या सगळ्या फ्रॅन्चायजींना सांगितलं आहे. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएसएलच्या सहाव्या मोसमाच्या मॅच जून महिन्यात पूर्ण केल्या जातील, असं एहसान मणींनी टीमच्या मालकांना सांगितलं. आशिया कपमध्ये भाग घेणाऱ्या टीमच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आशिया कप 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात येईल, असं एहसान मणी यांनी या बैठकीत सांगितलं. तसंच आशिया कपच्या नव्या तारखांबद्दलचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत होईल, असंही मणी यांनी म्हंटलं. खेळाडू आणि अधिकाऱ्यांना कोरोना झाल्यामुळे पीएसएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. पीएसएलचा हा मोसम 20 फेब्रुवारीपासून सुरू झाला होता. यानंतर 1 मार्चला स्पर्धेत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. इस्लामाबाद युनायटेडचा ऑस्ट्रेलियन खेळाडू फवाद अहमदची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यानंतर पुढच्याच दिवशी सपोर्ट स्टाफ आणि आणखी काही परदेशी खेळाडूंना कोरोना झाल्याचं पीसीबीने सांगितलं, यामध्ये इंग्लंडचा खेळाडू टॉम बॅन्टनचाही समावेश होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या