JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 100 वर्षांहून जास्त प्रतीक्षा संपणार! ICC च्या निर्णयामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक प्रवेशाचा मार्ग मोकळा

100 वर्षांहून जास्त प्रतीक्षा संपणार! ICC च्या निर्णयामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक प्रवेशाचा मार्ग मोकळा

भारतामधील सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटचा (Cricket) ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश कधी होणार? याबाबतची फॅन्सची प्रतीक्षा संपण्याची चिन्हं आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जुलै : भारतामधील सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटचा (Cricket) ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समावेश कधी होणार? याबाबतची फॅन्सची  प्रतीक्षा संपण्याची चिन्हं आहेत. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी बराच काळापासून प्रयत्न करत आहे. आयसीसीनं मंगळवारी घेतलेल्या एका निर्णयामुळे 2028 साली अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत (Los Angeles Olympics) क्रिकेटच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. आयसीसीनं मंगळवारी 2024 ते 2031 सालापर्यंतच्या 8 मोठ्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार 2024 साली होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपचं यजमानपद (T20 World Cup 2024) वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांना देण्यात आले आहे. टी-20 क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये (T20 Cricket in Olympic) प्रवेश व्हावा, यासाठी आयसीसीने (ICC) पहिलं पाऊल उचललं आहे. 2028 मधील ऑलिम्पिक स्पर्धेवर नजर ठेवत हा निर्णय घेण्यात आला आहे. . क्रिकेटला ग्लोबल फोकस देण्यासाठी अमेरिकेत टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. 2014 साली बांगलादेशमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर ही पहिली मोठी स्पर्धा असेल, ज्याचं आयोजन भारत, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया करणार नाही. T10 ला मिळणार मान्यता? ऑलिम्पिक स्पर्धेत T10 हा क्रिकेटचा सर्वात झटपट प्रकार खेळला जाण्याची शक्यता आहे.  यूएईमध्ये गेल्या काही वर्षांपासून T10 लीग स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेला आयसीसीनं अद्याप मान्यता दिलेली नाही. टेस्ट, वन-डे आणि टी20 क्रिकेटलाच आयसीसीची मान्यता आहे. पण ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून लकरच T10 क्रिकेटलाही आयसीसीची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळणार मोठी जबाबदारी, अनिल कुंबळेची घेणार जागा यापूर्वी फक्त एकदा समावेश क्रिकेटचा यापूर्वी फक्त 1900 साली पॅरीसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला होता.  त्या स्पर्धेत ब्रिटन आणि फान्स या दोनच देशांच्या क्रिकेट टीम सहभागी झाल्या होत्या. ब्रिटननं यजमान फ्रान्सचा पराभव करत ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकलं होतं. पुढील वर्षी बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Birmingham Commonwealth Games in 2022) महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या