JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / नीरज चोप्राने घडवला इतिहास, पहिल्यांदाच बनला वर्ल्ड नंबर 1

नीरज चोप्राने घडवला इतिहास, पहिल्यांदाच बनला वर्ल्ड नंबर 1

नीरज चोप्राने वर्ल्ड एथलेटिक्सकडून जारी करण्यात आलेल्या भालाफेकपटूंच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.

जाहिरात

नीरज चोप्रा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मे : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने वर्ल्ड एथलेटिक्सकडून जारी करण्यात आलेल्या भालाफेकपटूंच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. कारकिर्दीत पहिल्यांदात चो वर्ल्ड नंबर वन ठरला आहे. नीरज चोप्रा सध्या 1455 गुणांचं पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ग्रेनाडाच्या वर्ल्ड चॅम्पियन अँडरसन पीटर्सला 22 गुणांनी मागे टाकलं. एंडरसनचे 1433 गुण आहेत. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलेल्या झेक प्रजासत्ताकचा जॅकब वडलेज्च 1416 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. नीरज चोप्रा गेल्या वर्षी 30 ऑगस्टला वर्ल्ड रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता. तेव्हापासून पीटर्सला मागे टाकता आलं नव्हतं. नीरज चोप्रा सध्याच्या हंगामात जबरदस्त कामगिरी करत आहे. त्याने दोहात झालेल्या डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरीसह सुवर्णपदक पटकावलं. त्याने 88.67 मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा ज्युरिचमध्ये तो खेळला होता. तेव्हा डायमंड लीगमध्ये 89.63 मीटर भाला फेकला होता. आता नीरज चोप्रा 4 जूनला नेदरलँडमध्ये फॅनी ब्लँकर्स कोएन गेम्समध्ये भाग घेणार आहे. IPL 2023 : ‘ते दोघं मुंबईसाठी खेळले’, गिलच्या शतकानंतर सचिन खूश!   नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यानं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत माझ्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करेन. पुढचं ऑलिम्पिक 2024 मध्ये होणार आहे. डायमंड लीग जिंकल्यानंतर म्हटलं होतं की, मी माझ्या कामगिरीमुळे आनंदी आहे. इथं कामगिरी करणं आव्हानात्मक होतं पण यात आणखी सुधारणा करण्याची माझी इच्छा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या