JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / धोनीचा जबरा फॅन! वाढदिवसाआधी माहीला स्वतःच्या रक्ताने लिहिलं पत्र

धोनीचा जबरा फॅन! वाढदिवसाआधी माहीला स्वतःच्या रक्ताने लिहिलं पत्र

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असतानाही मी एक-एक रुपया जोडून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे’, असं तो म्हणाला.

जाहिरात

'मी महेंद्र सिंह धोनीचा खूप मोठा चाहता आहे. मी लहानपणापासून त्यांना खेळताना पाहिलंय.'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रवी पायक, प्रतिनिधी भिलवाडा, 25 जून : भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा सध्या त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. धोनीचे देश-विदेशात करोडो चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: तडपतात. अनेकजण त्याला देवही मानतात. आता राजस्थानच्या भिलवाडामधून धोनीचा एक असा जबरा फॅन समोर आला आहे की ज्याने चक्क स्वतःच्या रक्ताने धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धोनीचा वाढदिवस 7 जुलै रोजी असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त विजेश कुमार या तरुणाने एका क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. भिलवाडामध्ये होणाऱ्या या स्पर्धेचं आमंत्रण म्हणून धोनीला त्याने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलंय. या स्पर्धेचं नावही ‘हॅपी बर्थडे वर्ल्ड कप’, असं ठेवण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत 5 मैदानांवर 5 सामने खेळवले जातील. यामध्ये 12 संघ सहभागी होतील. संघांना यासाठी 1 जुलैपर्यंत नोंदणी करायची आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून रोख 31 हजार रुपये दिले जातील, तर उपविजेत्या संघाला 16 हजार रुपये मिळतील. Ajit Pawar : ‘तर माझं काय चुकलं?’ संघटनात्मक जबाबदारीबाबत अजितदादा पुन्हा एकदा बोलले विजेश कुमार याच्याशी याबाबत चर्चा केली असता त्याने सांगितलं, ‘मी महेंद्र सिंह धोनीचा खूप मोठा चाहता आहे. मी लहानपणापासून त्यांना खेळताना पाहिलंय. त्यांच्यामुळेच मी क्रिकेट खेळायला शिकलो. त्यांनी आपल्या देशासाठी जे काही केलं आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे. त्यामुळे मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास करण्याचा विचार केला. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असतानाही मी एक-एक रुपया जोडून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे’, असं तो म्हणाला. दरम्यान, विजेश कुमार याच्या या कृत्याबद्दल देशभरात चर्चा आहे. अशाप्रकारे रक्ताने पत्र लिहिणं कॅप्टन कूल धोनीला आवडणार नाही, असंही म्हटलं जात आहे. तर अनेकजण हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हणत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या