MS Dhoni News : चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल जिंकल्यानंतर क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंह धोनी आता प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठीसोबत दिसला आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. पाहा PHOTOS
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे परंतु तो अजूनही फार Active असतो. धोनी सध्या जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. धोनीने अलीकडेच पंकज त्रिपाठी उर्फ 'कालिन भैया' सोबत एक जाहिरात शूट केली.
धोनीचा हा फोटो त्याचा बालपणीचा मित्र सीमांत लोहानी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. लोहानी हे वयाच्या चौथ्या वर्षापासून धोनीचे मित्र आहेत. धोनीच्या 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात त्याचा जिवलग मित्र लोहानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
काही दिवसांपूर्वी धोनी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगसोबत एका अॅड शूटमध्ये दिसला होता. धोनी-युवराज यांना वर्षांनंतर एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. यात दोघेही सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.
महेंद्रसिंह धोनी शेवटचा IPL 2021 च्या फायनलमध्ये क्रिकेटच्या मैदानावर दिसला होता. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. 40 वर्षीय धोनी IPL च्या 2022 हंगामात खेळताना दिसणार आहे.
महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपर किंग्सने 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. मात्र यावेळी चेन्नईने रवींद्र जडेजाला त्याच्यापेक्षा जास्त पैसे दिले आहेत. जडेजाला 16 कोटींमध्ये रिटेन करण्यात आलं आहे.
एमएस धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. आयपीएलमधून 150 कोटींहून अधिक कमावणारा धोनी हा एकमेव क्रिकेटर आहे.