आयपीएलमधून निवृत्तीवर धोनीची प्रतिक्रिया
अहमदाबाद, 30 मे : आयपीएल2023मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला चेन्नईने 5 विकेट राखून हरवलं. चेन्नईच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. दरम्यान, या हंगामाच्या सुरुवातीपासूनच धोनीच्या आय़पीएलमधून निवृत्तीची चर्चा केली जात होती. धोनीचा हा अखेरचा हंगाम असेल असंह म्हटलं जात होतं. प्रत्येक मैदनावर चाहत्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. त्याचे पाठीराखे मैदानावर उपस्थित होते. त्यामुळे धोनी निवृत्ती घेणार अशी शक्यता व्यक्त होती. आता पाचवं विजेतेपद पटकावल्यानंतर धोनीने निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. धोनीला त्याचा हा शेवटचा हंगाम आहे का असं विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की परिस्थिती पाहिली तर माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. माझ्यासाठी हे बोलणं सोपं आहे की मी निरोप घेतोय. पण पुढच्या नऊ महिन्यात कठोर मेहनत करून परतणे आणि त्यानंतर एक हंगाम खेळणं कठीण आहे. IPL 2023 : CSKला 20 कोटी तर गुजरातही मालामाल, खेळाडूंवरसुद्धा बक्षीसांचा वर्षाव धोनी म्हणाला की, शरीराने साथ द्यायला हवी. चेन्नईच्या चाहत्यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी मी आणखी एक हंगाम खेळणं हे गिफ्ट असेल. त्यांनी जे प्रेम केलं त्यासाठी मलाही काहीतरी करायला हवं.
माझ्या करिअरचा हा शेवटचा टप्पा आहे. इथूनच सुरुवात झाली होती आणि स्टेडियममध्ये माझं नाव घेतलं जात होतं. असं चेन्नईतही झालं होतं, पण मी पुनरागमन करून जितकं खेळू शकतो तेवढं खेळेन. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी काही वेळ डगआऊटमध्येच उभा राहिलो. मला जाणवलं की मला याचा आनंद घ्यायचा आहे असंही धोनीने म्हटलं.