Yuvraj Singh & MS Dhoni
नवी दिल्ली, 7 डिसेंबर: टीम इंडियाचा सर्वांचा लाडका माजी कर्णधार एमएस धोनी(MS Dhoni ) बऱ्याचदा आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असतो, आताही त्याने त्याचा जुना जोडीदार युवराज सिंगला (Yuvraj Singh)भेटून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सध्या दोघांचा संवाद साधतेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बऱ्याच दिवसांनी दोघे एकत्र आल्याने चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे. सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे ज्यामध्ये भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग माहीसोबत दिसत आहे. दोघेही सोफ्यावर बसून एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. यादरम्यान दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. हा व्हिडिओ युवराजने त्याच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनवर शेअर केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
दोघांचा हा व्हिडीओ पाहून चाहते भलतेच खूश झाले आहेत. त्यांनी व्हिडिओचे स्क्रिनशॉट शेअर करत धोनी-युवी का रीयूनियन असे म्हटले आहे.
युवराज आणि धोनी करिअरच्या सुरुवातीला चांगले मित्र होते. मात्र, यादरम्यान अनेक वेळा या दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. युवराजचे वडील योगराज सिंग धोनीवर सतत आरोप करत असत पण युवराजने त्या आरोपांचे कधीच समर्थन केले नाही. युवीचे वडील योगराज सिंग यांनी माहीच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उभे करत मुलाचे आंतरराष्ट्रीय करिअर संपवल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे त्यांच्या चाहत्यांची द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. पण क्रिकेट चाहत्यांना या व्हायरल झालेल्या व्हिडिओने दिलासा दिला आहे.
क्रिकेटच्या मैदानात एमएस धोनी आणि युवराज सिंगची फलंदाजीतील भागीदारी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. या दोघांनी मिळून टीम इंडियाला 2007 चे चॅम्पियन बनवले आणि 2011 मध्ये ICC T20 वर्ल्ड कपमध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
एमएस धोनी पुढील वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर युवराज सिंग रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लीजेंड्सचे प्रतिनिधित्व करेल.