JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / स्पोर्ट्स / कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक SIX: 5 देशांचे खेळाडू आहेत टॉप लिस्टमध्ये; भारतातील कोण आहे?

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक SIX: 5 देशांचे खेळाडू आहेत टॉप लिस्टमध्ये; भारतातील कोण आहे?

Most Sixes in Test Cricket: कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला संयमाने खेळायचे असते. मात्र, आता हा ट्रेंड हळूहळू बदलत आहे. आता क्रिकेटपटूंना कसोटी फॉर्मेटमध्ये खेळतानाही चौकार आणि षटकार मारायचे असतात. जाणून घेऊया कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-5 क्रिकेटर्स कोण आहेत.

0107

प्रत्येक खेळाडूला क्रिकेटच्या या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये शानदार खेळी करायची असते. कसोटी फॉरमॅटमध्ये षटकार मारण्याऐवजी खेळाडूंना जास्त वेळ मैदानावर राहायचे असते आणि संघासाठी योगदान देणे हे कोणाचेही पहिले लक्ष्य असते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत टॉपर खेळाडूंची यादी पाहुया. (एएफपी)

जाहिरात
0207

दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॅक कॅलिस या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. कॅलिसने 166 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 97 षटकार मारले. कॅलिसच्या नावावर कसोटीत 45 शतके आहेत. (एएफपी)

जाहिरात
0307

क्रिकेटमध्ये षटकारांविषयी बोलायचे झाल्यास वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचे नाव पुढे येणार नाही, असे होईल? या यादीत गेल चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 103 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 98 षटकार मारले आहेत. (एएफपी)

जाहिरात
0407

इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याकडे सध्या गिलख्रिस्टच्या बरोबरीचे 100 षटकार आहेत. आणखी एक षटकार मारला तर तो गिलख्रिस्टला मागे टाकेल. स्टोक्सने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (एएफपी)

जाहिरात
0507

या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एकूण 100 षटकार आहेत. तसेच त्याने कसोटीत एकूण 17 शतके झळकावली आहेत. (एएफपी)

जाहिरात
0607

या यादीत न्यूझीलंडचा माजी दिग्गज ब्रेडन मॅक्युलम पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 101 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 107 षटकार आहेत. यादरम्यान त्याने 776 चौकारही लगावले आहेत. कसोटीत त्याने 12 शतके झळकावली आहेत. मॅक्क्युलम सध्या इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. (एएफपी)

जाहिरात
0707

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. गिलख्रिस्ट आणि स्टोक्स यांच्या बरोबरच 100 षटकार असले तरी सेहवाग 5 व्या क्रमांकावर आहे. या यादीत सेहवागशिवाय दुसरा कोणताही भारतीय क्रिकेटपटू नाही. (एएफपी)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या