JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / नटराजन-शार्दुलनंतर आनंद महिंद्रांनी आणखी एका क्रिकेटपटूला दिली Thar

नटराजन-शार्दुलनंतर आनंद महिंद्रांनी आणखी एका क्रिकेटपटूला दिली Thar

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी भारतीय फास्ट बॉलर टी.नटराजन (T.Natrajan) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्यानंतर आणखी एका भारतीय खेळाडूला महिंद्रा एसयूव्ही थार (Mahindra Thar) ही गाडी गिफ्ट दिली आहे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) घरी महिंद्रा यांनी दिलेली थार पोहोचली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 एप्रिल : उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी भारतीय फास्ट बॉलर टी.नटराजन (T.Natrajan) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्यानंतर आणखी एका भारतीय खेळाडूला महिंद्रा एसयूव्ही थार (Mahindra Thar) ही गाडी गिफ्ट दिली आहे. हैदराबादमध्ये राहणाऱ्या मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) घरी महिंद्रा यांनी दिलेली थार पोहोचली आहे. घरामध्ये गाडी आली तेव्हा मोहम्मद सिराज नव्हता, त्यामुळे त्याचा भाऊ आणि आईने हे गिफ्ट स्वीकारलं. ऑस्ट्रेलियातल्या भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर (India vs Australia) अनेकांना प्रभावित केलं होतं, यामध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचाही समावेश होता. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या भारताच्या विजयानंतर महिंद्रा यांनी मोहम्मद सिराज, टी.नटराजन, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना महिंद्रा थार गिफ्ट द्यायची घोषणा केली होती.

आनंद महिंद्रा यांनी याआधी नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांना महिंद्रा थार दिली होती. सिराजने गाडी घरी पोहोचल्यानंतर आनंद महिंद्रांचे आभार मानले. ‘मला या गोष्टी शब्दांमध्ये सांगता येणार नाहीत. तुम्ही दिलेल्या गिफ्टबद्दल भावना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. खूप खूप आभार आनंद महिंद्रा सर,’ असं ट्वीट मोहम्मद सिराजने केलं आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात

मोहम्मद सिराजने भारताकडून 5 टेस्ट, एक वनडे आणि 3 टी-20 मॅच खेळल्या आहेत. ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये सिराजने 73 रन देऊन 5 विकेट घेतल्या आणि भारताला सीरिज जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावली. सिराजने टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 16 विकेट घेतल्या आहेत. 27 वर्षांचा सिराज सध्या आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या तयारीला लागला आहे. सिराज आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातल्या बँगलोरकडून खेळतो. यावर्षी बँगलोरची पहिलीच मॅच 9 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या