नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : ‘जंगल-जंगल पता चला है, चड्डी पहनकर फूल खिला है.’ जंगल बुकमधलं हे गाण आजही लोकांच्या मनावर कोरलं गेलं आहे. लहानमुलच नव्हे तर मोठ्यांमध्येही गाण्याचे वेड आहे. मात्र आता एका नवा मोगलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चड्डी घातलेला एक मुलगा डायपर घालून क्रिझवर तुफान फलंदाजी करत आहे. त्याचे शॉट आणि बॅटिंग स्टाईल पाहून तुम्हाला सचिन तेंडुलकरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ दिग्गजांनी शेअर केला आहे. घरातच शुट केलेला हा व्हिडीओ लाखो लोकांनी शेअर केला आहे. एवढेच नाही तर दिग्गज क्रिकेटर मायकल वॉननेही हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओमध्ये असलेल्या चिमुरड्याची तुलनाही सचिन तेंडुलकरशी केली जात (Sachin Tendulkar) आहे.
दमदार शॉट लगावतोय दिग्गज ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हा चिमुरडा शर्ट, ग्लोव्ह्ज आणि चड्डी घालून बॅटींग करत आहे. डायपर घालून हा चिमुरडा बॅटिंग करत आहे. यात कोणीतरी त्याला गोलंदाजी करताना दिसत आहे. हा चिमुरडा बॅटिंग करताना मोठे मोठे शॉट खेळताना दिसत आहे. यात सचिन प्रमाणेच या चिमुरड्याची नजर आणि स्टान्स आहे. मात्र हा व्हिडीओ कोणी अपलोड केला याबाबत अद्याप माहिती नाही आहे.
बॅटिंगचे फॅन झाले नेटकरी व्हायरल व्हिडीओमध्ये हा चिमुरडा दमदार शॉट खेळताना दिसत आहे. ट्विटरवर या मुलाचे जोरदार कौतुक होत आहे. एका प्रोफेशनल क्रिकेटरप्रमाणे हा चिमुरडा फलंदाजी करत आहे. एवढंच नाही तर सचिन स्टाईल स्ट्रेट ड्राईव्हही मारताना हा दिसत आहे.